पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:26 PM2019-08-07T12:26:49+5:302019-08-07T12:27:33+5:30

खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.

 Suicide time on a farmer who praised by Prime minister | पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या शेतकऱ्यावरही आत्महत्येची वेळ!

Next

अकोला: राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात जमीन मोबदल्याची रक्कम कमी मिळाल्याच्या प्रकरणात पारित आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, सोमवार, ५ आॅगस्ट रोजी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केलेले शेतकरी मुरलीधर राऊत यांचाही समावेश आहे. खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतलेल्या शेतकºयाच्या बाबतीतही सरकारी अनास्था या निमित्ताने समोर आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनामार्फत भूसंपादन करण्यात आले. भूसंपादनापोटी जमिनीचा मोबदला कमी मिळाल्याने, जमीन मोबदल्याची वाढीव रक्कम मिळण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले होते. अपीलवर सुनावणीनंतर अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी पारित केलेल्या आदेशामध्ये जमीन मोबदल्याची रक्कम वाढवून देण्यात आली नसल्याने, नीळंकठराव काशीराव देशमुख (पैलपाडा), अर्चना भारत टकले (कान्हेरी गवळी), आशीष मदन हिवरकर (कान्हेरी गवळी), मुरलीधर प्रल्हाद राऊत (शेळद), मोहम्मद अफजल गुलामनबी रंगारी, साजिद इकबाल शेख महेमूद सर्व रा. बाळापूर इत्यादी सहा शेतकºयांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
विष प्राशन केलेल्या सहा शेतकºयांपैकी मुरलीधर राऊत यांचे अकोला-बाळापूर मार्गावर ‘मराठा’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रात्री टॅÑव्हल्स जेवणासाठी थांबतात. नोटबंदीच्या काळात रोख रकमेची आणि सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण झाल्याने प्रवाशांकडे जेवणासाठी पैसे नसायचे. त्या कालावधीत शेतकरी मुरलीधर राऊत यांनी प्रवाशांसाठी विनाशुल्क जेवणाची व्यवस्था केली होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून जाहीर कौतुक केले होते. पंतप्रधानांनी कौतुक केलेले मुरलीधर राऊत यांच्या मालकीच्या हॉटेलची जमीन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली. संपादित केलेल्या जमिनीचा अत्यंत अल्प मोबदला मिळाल्याने, वाढीव मोबदल्यासाठी मुरलीधर राऊत सरकारकडे पाठपुरावा करीत होते. याच मागणीसाठी इतरही शेतकरी प्रशासनाकडे दाद मागत होते; मात्र जमिनीचा वाढीव मोबदला मिळत नसल्याने, सरकारी अनास्थेला कंटाळून पंतप्रधानांनी कौतुक केलले शेतकरी मुरलीधर राऊत यांच्यासह सहा शेतकºयांनी ५ आॅगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
 

 

Web Title:  Suicide time on a farmer who praised by Prime minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.