आजपासून अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:11 AM2020-07-01T10:11:07+5:302020-07-01T10:11:16+5:30

१ जुलै ते ४ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत इच्छुक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

Special campaign for health check-up of Akolekar from today | आजपासून अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम

आजपासून अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम

Next

अकोला : महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येत असल्याचे पाहून शहरातील जिल्हा प्रशासन, मनपा तसेच निमा, जीपीए आदी डॉक्टर संघटना पुढे सरसावल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर रुग्ण तपासणीसाठी १ जुलै ते ४ जुलै या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत इच्छुक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा शिरकाव महापालिका क्षेत्रामध्ये झाला असून, शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील विविध भागात होत असल्याने संशयित रुग्णांचा शोध घेताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. शहरवासीयांमध्ये कोरोनाबाबत धास्ती व भीतीचे वातावरण असल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात नमुने देण्याकडे नागरिक पाठ फिरवित असल्याचे जिल्हा व महापालिकेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांना समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी केले असता, या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टरांच्या विविध संघटना समोर आल्या आहेत. उद्या बुधवारपासून शहरातील चारही झोनमधील निमा व जीपीए डॉक्टर संघटनेच्या सर्व क्लिनिकमध्ये नागरिकांची तपासणी व उपचार मोफत करणे, संशयित कोरोना रुग्णांना योग्य मार्गदर्शन केल्या जाणार आहे.

हरिहरपेठमधील ‘स्वॅब’ केंद्र बंद
पश्चिम झोन अंतर्गत येणाºया हरिहरपेठमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येणाºया संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून मनपाने छत्रपती शिवाजी टाऊन शाळेत ‘स्वॅब’ संकलन केंद्र सुरू केले होते. मंगळवारी रुग्ण संख्येत घसरण आल्याचे पाहून या ठिकाणचे केंद्र बंद करण्यात आले आहे. उद्या बुधवारी खदान परिसरात नव्याने ‘स्वॅब’ संकलन केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

Web Title: Special campaign for health check-up of Akolekar from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.