जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:14 PM2020-06-22T13:14:11+5:302020-06-22T13:16:06+5:30

शुभम शंकरराव बाहकर याने परिक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे.

Son of Zilla Parishad school teacher become Tehsildar | जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाचा मुलगा तहसीलदार

Next

- सत्यशील सावरकर

तेल्हारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये तेल्हारा शहरातील प्रबोधन काॅलनी येथील शुभम शंकरराव बाहकर याने परिक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे.
         तेल्हारा येथील प्रबोधन काॅलनी मधील अध्यापक शंकरराव बाहकर व सौ. वंदना यांचा मुलगा शुभम व एक मुलगी रेणुका असे कुटुंब राहत असले तरी शुभम चे मुळगाव पिंप्री येथे एकत्र कुटुंबात प्राथमिक शिक्षण झाले त्यानंतर तेल्हारा येथील से.ब. विद्यालयात पुढील शिक्षण करून नांदेड इंजीनियरिंग मेकेनिकल मध्ये पदवी घेतली व कुणबी मराठा युवकांना मिळणारी सारथी शिक्षववृत्ती अंतर्गत पूणे येथे क्लास साठी निवड झाली. पदवी नंतर नोकरी न करता मिळणाऱ्या शिषववृत्तीवर विविध स्पर्धा परिक्षाचा अभ्यास केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. शिक्षण करत असताना शुभमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. त्यामुळे जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शुभम यांनी मिळवलेल्या यशाने तेल्हारा शहर व मुळगाव पिंप्री येथील नागरिकांनी बाहकर कुटुंबातील सदस्यांचे कौतुक केले तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधुन तहसीलदारपदी निवड झाल्याने सहा एमबीबीएस,तिन बिएएमस,दहा पदवीधर,व सर्व कुटुंबात एक दोन शिक्षक असलेल्या प्रबोधन काॅलनीतील शैक्षणिक उच्चांकात भर टाकल्याने त्यांचे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Son of Zilla Parishad school teacher become Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.