son murder his father by heating rod on head | मुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या 
मुलानेच केली जन्मदात्या बापाची हत्या 

 

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानशिवणी येथील मुलानेच जन्मदात्या बापाची लोखंडी राॅडने मारुन हत्याकेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर सदर आरोपी पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 
प्राप्त माहितीनुसार कानशिवनी येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव राऊत वय 70यांना दोन मुली, दोन मुले आहेत, तर चंदु नामदेव राऊत हा परिवारात मोठा. आहे. तो व्यसनाधीन असल्याचे बोलल्या जाते. तो वडीला सोबत वाद घालायचा नेहमीप्रमाणेच वडील व सर्व कुटुंब शुक्रवारी रात्री झोपी गेले. दरम्यान चंदु यांने लोखंडी राॅडने झोपेत असलेल्या आपल्या जन्म दात्यावर वार केले. नामदेव राऊत हे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच मृत्यु झाला. सदर घटनेची माहीती ठाणेदार हरिश गवळी यांना मिळताच घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा व मृदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. घटनास्थळावर श्वान पथक, ठसे तज्ञ यास पाचारण करण्यात आले होते.  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पसार झालेल्या आरोपी चा पोलीस शोध घेत आहेत.


Web Title: son murder his father by heating rod on head
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.