अकोल्यात शनिवारी सहा जणांचा मृत्यू, २९० नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 07:50 PM2021-04-03T19:50:14+5:302021-04-03T19:50:28+5:30

CoronaVirus in Akola : आणखी सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४६८ झाली आहे.

Six killed, 290 positive in Akola on Saturday | अकोल्यात शनिवारी सहा जणांचा मृत्यू, २९० नव्याने पॉझिटिव्ह

अकोल्यात शनिवारी सहा जणांचा मृत्यू, २९० नव्याने पॉझिटिव्ह

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी आणखी सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या ४६८ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८४, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १०६ अशा एकूण २९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २८,५६५ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०४५ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील १८, अकोट येथील १५, मलकापूर येथील आठ, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी सहा, कौलखेड येथील पाच, बाळापूर येथील चार, आदर्श कॉलनी, घुसर, राजंदा (ता. बार्शीटाकळी) व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, शिवार, जीएमसी, बंजारानगर, देगाव, सहकारनगर, बोरगाव मंजू, लक्ष्मीनगर, अलंदा, शिवसेना वसाहत, शिवणी, पैलपाडा, खडकी, केशवनगर, देशमुख फैल, न्यू तापडियानगर, जठारपेठ व पिंजर बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, रेल्वे कॉलनी, रिधोरा, पंचशीलनगर, छोटी उमरी, म्हैसांग, नकाशी, वाडेगाव, कानशिवणी, पाथर्डी (ता. तेल्हारा), नया अंदुरा, हाता, निंबा, जयहिंद चौक, तारफैल, रामधन प्लॉट, सोपीनाथ पनगर, मालीपुरा, रामदास पेठ, खोलेश्वर रोड, बार्शीटाकळी, शिवनगर, रामनगर, तुकाराम चौक, आलेगाव (ता. पातूर), खरप, खिरपूर, खुर्द, खेडकरनगर, जवाहरनगर, न्यू हिंगणा, रणपिसेनगर, मोठी उमरी, लहरियानगर, हातरुण (ता. बाळापूर), जुने शहर, गुडधी, हमजा प्लॉट, रायगड कॉलनी, येळवन व अकोट फैल येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी मोठी उमरी येथील चार, गोरक्षण रोड येथील तीन, रणपिसेनगर, राऊतवाडी, सिंधी कॅम्प, दाताळा व मिर्झापूर येथील दोन, तर उर्वरित लहान उमरी, सुकोडा, भागवतनगर, रेल्वे स्टेशन, पातूर, गुडधी, गोकुल कॉलनी, आनंदनगर, जठारपेठ, न्यू बसस्टॅण्ड, भनकपुरी, न्यू तापडियानगर, गोयंकानगर, कोकणवाडी, रेल्वे कॉलनी, सांगवामेळ, कुटसा, रेल व पिलकवाडी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

येथील सहा जणांचा झाला मृत्यू

शनिवारी सहा मृत्यूंची नोंद झाली. मलकापूर, अकोला येथील ६५ वर्षीय महिला, पिंजर (ता. बार्शीटाकळी) येथील ७२ वर्षीय पुरुष, निंबा (ता. बाळापूर) येथील ७५ वर्षीय पुरुष, जुने शहर, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष, बार्शीटाकळी येथील ६७ वर्षीय पुरुष व पिंपळखुटा (ता. अकोट) येथील ६० वर्षीय पुरुष अशा सहाजणांचा शनिवारी मृत्यू झाला.

५९३ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आयकॉन हॉस्पिटल येथील तीन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील नऊ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील एक, यकीन हॉस्पिटल येथील चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, नवजीवन हॉस्पिटल येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, आधार हॉस्पिटल, मूर्तिजापूर येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील दोन, अवघाते हॉस्पिटल येथील एक, ओझोन हॉस्पिटल येथील सात, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ५२० अशा एकूण ५९३ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

४,७१५ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८,५६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २३,३८२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४६८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,७१५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Six killed, 290 positive in Akola on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.