निहीदा परिसरात पुर्णत: सन्नाटा; मजुरांना पडला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 04:45 PM2020-03-24T16:45:07+5:302020-03-24T16:46:52+5:30

ज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.

Silence in the village; Labor question for livelyhood | निहीदा परिसरात पुर्णत: सन्नाटा; मजुरांना पडला उदरनिर्वाहाचा प्रश्न

निहीदा परिसरात पुर्णत: सन्नाटा; मजुरांना पडला उदरनिर्वाहाचा प्रश्न

Next
ठळक मुद्देज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.शेतीचे कामे वगळता इतर ठिकाणी सुद्धा कोठलेच कामे नाहीत.

निहिदा : रविवारच्या जनता कर्फ्यूपासून ग्रामीण भागात पूर्णत: सन्नाटा पाहावयास मिळत आहे आणि ज्या मजुरांना दररोज कमावणे आणि उदरनिर्वाह करणे अशांना मात्र आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न पडला आहे.
गेल्या आठ दिवसांपासूनच ग्रामीण भागातील मजूर कोरोनाचे भितीने शेतात काम करण्यासाठी जात नव्हते. रविवारच्या जनता कर्फ्यूपासून तर आजच्या संचारबंदीपर्यंत या भागातील लोक घरात बसून आहेत. मजूर वर्ग तर कायम घरात बसून आहे. मात्र, ज्या मजूराचे हातावर पोट आहे. अशांची मोठी पंचाईत आहे. शेतीचे कामे वगळता इतर ठिकाणी सुद्धा कोठलेच कामे नाहीत. कारण आता सर्वीकडे संचारबंदी लागू झाली आहे. एकीकडे कोरोना हटविण्यासाठी घरीच थांबावे लागेल. तर दुसरीकडे घरी बसून पोट कसे भरणार असाही प्रश्न लोकांना पडला आहे. अनेक मजूरांनी डोक्यावर हात दिला आहे. निहीदा, लखनपूर, सावरखेड, टिटवा, जनूना, महागाव, पिंपळगाव (हांडे), पिंपळगाव (चांभारे), धाकली, जमकेश्वर येथील मजूरांना शेतात व इतर ठिकाणी काही कामधंदे नसल्याने त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. या सर्व गावांत पुर्णत: सन्नाटा पसरला असून सर्व रस्ते ओस पडले. सर्वत्र शुकशुकटात दिसून येत आहे.

Web Title: Silence in the village; Labor question for livelyhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.