विवाहितेवर अत्याचार; पतीवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:05 PM2019-09-24T14:05:17+5:302019-09-24T14:05:42+5:30

आरोपीने फिर्यादीच्या पतीजवळची तलवार हिसकावून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला.

sexualy abuse married women; Fatal attack on husband | विवाहितेवर अत्याचार; पतीवर जीवघेणा हल्ला

विवाहितेवर अत्याचार; पतीवर जीवघेणा हल्ला

Next

मंगरूळपीर : विवाहितेवर अत्याचार करून तिच्या पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगरूळपीर शहरातील दिवानपुरा येथे २२ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी जावेदखान जायदखान (२७) रा. दिवानपुरा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
शहरातील दिवानपुरा येथील एका २३ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, २२ सप्टेंबरच्या रात्री दरम्यान आरोपी जावेदखान जायदखान याने फिर्यादीच्या घरी येऊन अनैतिक संबंधासाठी बळजबरी केली. फिर्यादीने आरडाओरड केली असता, फिर्यादीचा पती हा तलवार घेऊन आला. आरोपीने फिर्यादीच्या पतीजवळची तलवार हिसकावून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३०७,३७६,४४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करून २३ सप्टेंबरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, याप्रकरणी जावेदखान जायदखान यांनीही फिर्याद दिली असून, तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. जावेदखान जायदखान यांनी तक्रारीत नमूद केले, की २२ सप्टेंबरच्या रात्री ते एकटे घरी जात असताना आरोपी शे. शब्बीर शे. हुसेन, शे. आसिफ शे. हुसेन यांनी क्षुल्लक कारणारून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातून तलवार आणून अंगावर उगारली. यावेळी प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील तलवार हिसकावून घेतली असता त्यात जखमी झालो. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद दोन्ही आरोपींवर भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६, आर्म अ‍ॅक्ट ३, २५ व कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: sexualy abuse married women; Fatal attack on husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.