अकोल्यात कोरोनाचे आणखी सात बळी, ३०० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:01 PM2021-04-10T19:01:18+5:302021-04-10T19:01:31+5:30

Corona Cases in Akola : १० एप्रिल रोजी आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४९९ झाला आहे.

Seven more corona victims in Akola, 300 new positive | अकोल्यात कोरोनाचे आणखी सात बळी, ३०० नवे पॉझिटिव्ह

अकोल्यात कोरोनाचे आणखी सात बळी, ३०० नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १० एप्रिल रोजी आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४९९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १९०, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ११० असे एकूण ३०० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ३०४२८ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,३९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित् १,२०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड येथील ११, मोठी उमरी व तेल्हारा येथील आठ, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी सात, पारस, मलकापूर, शास्त्री नगर, आळशी प्लॉट येथील प्रत्येकी पाच, तापडीया नगर येथील प्रत्येकी चार, जीएमसी, केशव नगर, बाभुळगाव, जठारपेठ, गीतानगर येथील प्रत्येकी तीन, तर आपातापा रोड, पातूर, डोंगरगाव, जुनेशहर, बाळापुर, चांदूर, शिवनी, गोरक्षण रोड, बार्शी टाकळी, गिरीनगर, खडकी, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, रघुनंदन सोसायटी येथील प्रत्येकी दोन, पिंपळखुटा, पिंजर, मोहराळ, साल्पि, वाल्पि, वाघजाळी, मनुताई कन्या विद्यालय, म्हैसपूर, आदर्श कॉलनी, दापुरा ता. तेल्हारा, कापशी तलाव, कान्हेरी गवळी, शिवसेना वसाहत, शिवर, लहान उमरी, उगवा, गंगानगर, दनोरी, हाजी नगर, रामनगर, बोरगाव, कान्हेरी, हरिहरपेठ, रिधोरा, वाडेगाव, शेलार फाईल, अनिकट, शिवनगर, विजय नगर, रचना कॉलनी, कोळवई, बंजारा नगर, रमेशपूर, निमवाडी, वाशीम बायपास, श्रावगी प्लॉट, भरतपूर, कीर्तीनगर, सहकार नगर, कामा प्लॉट, रतनलाल प्लॉट, गजान नगर, वाडेगाव, बालाजीनगर, शिवनी खदान, उमरी, गुडधी, शेलाड ता. बालापुर, तोष्णिवाल लेआऊट, रणपिसेनगर, कृषीनगर, जवाहरनगर, दुर्गा चौक, गोकुळ कॉलनी, विजय नगर, बोरगाव मंजू, अकोट फाईल, सोनाळा व नायगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

सायंकाळी कौलखेड येथील तीन, डाबकी रोड, गीतानगर, केशव नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, कान्हेरी गवळी, गोरक्षण रोड. वरखेड ता. बार्शीटाकळी, तुकाराम चौक, अशोक नगर, मलकापूर, सिव्हील लाईन, तेल्हारा आणि शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

एक महिला, सहा पुरुष दगावले

अकोला शहरातील डाबकी रोड येथील ३५ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिला, पोळा चौक येथील ५२ वर्षीय पुरुष, माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, तर डाबकी रोड येथील ५३ वर्षीय पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली. सायंकाळी खाजगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. त्यात खोलेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष माजरी ता. बाळापूर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 

३७६ जणांचा डिस्चार्ज

उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सात, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, आधार हॉस्पिटल मूर्तिजापुर येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून चार, नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापुर येथून एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, समाजकल्याण मुलांचे वसतिगृह येथुन तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, देवसर हॉस्पिटल येथून पाच, युनिक हॉस्पिटल येथून एक तर होम आयसोलेशन मधील २८९ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३१ अशा एकूण ३७६ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.

३,७३८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०,४२८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,१९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४९९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Seven more corona victims in Akola, 300 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.