वाळूमाफीयांचा पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:06 PM2020-03-21T18:06:37+5:302020-03-21T18:06:44+5:30

पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले.

Sand Mafia attempt to crush police | वाळूमाफीयांचा पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

वाळूमाफीयांचा पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

Next


हिवरखेड: वान नदी तसेच नाल्यामधून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असताना शुक्रवारी दोन टिप्परला पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी टिप्पर चालकाने पोलिसांच्या दुचाकीवर वाहन चालवून दुचाकी चिरडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले.
हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आकाश राठोड हे कर्तव्यावर असताना दानापूरकडून दोन टिप्पर येत असल्याचे दिसले. त्यावेळी आकाश राठोड यांनी समोरून येणाऱ्या दोन टिप्पर टाटा कंपनीचे यांना थांबविण्याचा इशारा केला. यामधील टिप्पर चालकाने भरधाव वाहन अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामधील चालकाने काही वाळू हेड्रोलिकच्या साहाय्याने खाली टाकली तसेच मागून येणाºया टिप्पर चालकाने अंगावर टिप्पर आणून जखमी केले. तसे पुढे दोन्ही टिप्पर तळेगाव मार्गे अडगावकडे जात असता पोलीस कर्मचारी नीलेश खंडारे यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, खंडारे यांच्या दुचाकीवर वाहन नेले. त्यामध्ये वाहनावर असलेल्या राठोड यांनी उडी घेतली. यासंदर्भात पोलीस स्टेशनला माहिती दिली. शासकीय वाहन घेऊन महादेव शेंडे, शिवा गावंडे यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असताना वाहने मुंडगाव रोडवर लामकाणीकडे एक टिप्पर गेला. दुसरा टिप्पर चालक टिप्पर जागेवर सोडून पळाला. आकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून टिप्पर क्र. एमएच २८ बीबी १४१९ व विनानंबर टिप्पर चालकाविरुद्ध भादंवि कलम ३0७, ३५३, ३७९, १८६, ४२१, ३२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार आशिष लव्हंगळे पोलीस कर्मचारी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sand Mafia attempt to crush police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.