sand mafia attacks on police patil in akokla | पोलीस पाटलावर रेती माफियाने केला प्राणघातक हल्ला
पोलीस पाटलावर रेती माफियाने केला प्राणघातक हल्ला

खेट्री (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत निमखेड येथील पोलीस पाटील संतोष डीगंबर ओकटे  यांच्यावर रेती माफियांनी कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली या हल्ल्यामध्ये पोलीस पाटील संतोष ओकटे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर सतारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. 

निमखेड येथील एक रेती माफिया गावातील मन नदीतून ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करीत असताना पोलीस पाटील संतोष ओकटे यांनी ट्रॅक्टर थांबून रॉयल्टी असल्याबाबत विचारणा केली असता, संतप्त झालेल्या रेती माफिया ने कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला, पोलीस पाटील यांच्या डोक्यावर मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर तरी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर उपचारासाठी अकोला हलविण्यात आले, याप्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनच्या डायरीवर हल्ला केल्याची नोंद करण्यात आली होती, पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.


Web Title: sand mafia attacks on police patil in akokla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.