‘रेमडेसिविर इंजेक्शन’ वापराचे होणार ‘ऑडिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:56 AM2021-05-17T10:56:04+5:302021-05-17T10:56:10+5:30

Akola News : जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील ३२ कोविड रुग्णालयांना शनिवारी नोटीसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

'Remedicivir Injection's 'Audit' will be done in Akola | ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ वापराचे होणार ‘ऑडिट’

‘रेमडेसिविर इंजेक्शन’ वापराचे होणार ‘ऑडिट’

Next

अकोला : जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी ‘रेमडेसिविर इंजेक्शन’च्या वापराचे ‘ऑडिट’ वरिष्ठ डाॅक्टरांच्या चमूमार्फत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील ३२ कोविड रुग्णालयांना शनिवारी नोटीसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत कोविड रुग्णालयांना रेमडेसेविर इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरिक्त वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने, कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांना वाटप करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा संबंधित रुग्णांसाठी वापर करण्यात आला की नाही, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यक होते का, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत ऑडिट करण्यात येणार आहे. वरिष्ठ डाॅक्टरांच्या चमूकडून ऑडिट करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३२ खासगी कोविड रुग्णालयांना १४ व १५ मे रोजी नोटीसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांसाठी ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा वापर होतो की नाही, यासंदर्भात वरिष्ठ डाॅक्टरांच्या चमूकडून ऑडिट करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ३२ खासगी कोविड रुग्णालयांना यासंदर्भात नोटीसद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

- डाॅ. नीलेश अपार

उपविभागीय अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (रेमडेसिविर इंजेक्शन)

Web Title: 'Remedicivir Injection's 'Audit' will be done in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.