अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:08 AM2021-08-02T04:08:25+5:302021-08-02T04:08:25+5:30

आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेमीनपुरा येथील रहिवासी एक आराेपी वल्लभनगर येथील रहिवासी एका महिलेला साेबत घेऊन अमरावती जिल्ह्यात ...

A rapist from Akale is running a sex racket in Amravati | अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट

अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट

Next

आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेमीनपुरा येथील रहिवासी एक आराेपी वल्लभनगर येथील रहिवासी एका महिलेला साेबत घेऊन अमरावती जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली़ यावरून अमरवती पाेलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करीत दाेघांनाही ताब्यात घेतले़ तर या गाैरखधंद्यात जबरदस्तीने लाेटलेल्या तीन युवतींची पाेलिसांनी सुटका केली़ अमरावती पाेलिसांनी या देहव्यापार अड्ड्यावर एक फंटर पाठवून माहितीची खातरजमा केली़ त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवून या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला़ अकाेट फैलातील माेमीनपुरा येथील रहिवासी ३५ वर्षीय आराेपीसह त्याची साथीदार महिला या दाेघांना ताब्यात घेण्यात आले़ तर तीन युवतींची सुटका पाेलिसांनी केली़ या देहव्यापार अड्ड्यावरून सुमारे एक लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई अमरावती शहराच्या पाेलीस आयुक्त आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली़

Web Title: A rapist from Akale is running a sex racket in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.