शहरात डासांचा उच्छाद; फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 03:03 PM2019-07-30T15:03:28+5:302019-07-30T15:03:35+5:30

डासांच्या समस्येवर आरोग्य विभागाचा हवेत गोळीबार सुरू असल्यामुळे शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

Raising mosquitoes in the city; No fogging machine | शहरात डासांचा उच्छाद; फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही!

शहरात डासांचा उच्छाद; फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही!

Next

अकोला: शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे ढीग व तुंबलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे नागरिकांना विविध आजाराने ग्रासले असताना महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून नियमित फवारणी व धुरळणी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. डासांच्या समस्येवर आरोग्य विभागाचा हवेत गोळीबार सुरू असल्यामुळे शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या विविध भागात पावसाचे पाणी तुंबले असून, खुल्या भूखंडांवर सांडपाणी साचून आहे. साफसफाईच्या कामांचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्यामुळे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग साचले आहेत. परिणामी डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना नानाविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. डोकेदुखी, अंगदुखी, खोकला, सर्दी व तापेने अकोलेकर फणफणल्याचे चित्र आहे. अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असले तरी महापालिकेच्या मलेरिया विभागाला सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार वाढला. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, साचलेले पाणी व डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळा आणि हिवाळ््यात मलेरिया विभागाने शहरात नियमीत धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त असताना या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. फवारणीसाठी या विभागाने मागील १० वर्षांपासून नवीन मशीनची खरेदी केली नव्हती. फवारणीसाठी लागणारे औषध आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत प्राप्त होत असल्याने सदर औषधीचा तुटवडा भासण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अशा स्थितीत २० प्रभागांमध्ये नियमित फवारणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. विकास कामांचा गवगवा करणाºया सत्ताधाऱ्यांनी अकोलेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


धुरळणी, फवारणी कोणत्या प्रभागात?
मलेरिया (हिवताप)चे डास आढळल्यास घराच्या कानाकोपºयात, नाल्या, सर्व्हिस लाइन, खुले भूखंड, वाढलेली झुडपे आदी ठिकाणी फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. तसेच हवेतील कीटकांचा नाश करण्यासाठी धुरळणी केली जाते. धुरळणी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे ४० कर्मचाºयांची नियुक्ती केल्याचा दावा मलेरिया विभागाकडून केला जातो. असे असताना धुरळणी करणारे कर्मचारी नेमक्या कोणत्या प्रभागात आणि कधी फिरतात, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नगरसेवक झोपेत; अकोलेकरांचे मरण
सांडपाणी, घाणीमुळे प्रत्येक प्रभागात डासांची पैदास वाढली असताना सर्वपक्षीय नगरसेवक झोपा काढत आहेत का, असा नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून धुरळणी, फवारणीचा पत्ताच नसल्याचे नागरिक सांगतात.


वैद्यकीय आरोग्य विभागाला कर्तव्याचा विसर
पावसाळ््याच्या दिवसांमध्ये दरवर्षी विविध आजार, साथीच्या आजारांचा फैलाव होतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची आहे. संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी व यंत्रणेला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे त्यांना कोट्यवधींचे वेतन कशासाठी अदा करायचे, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

 

Web Title: Raising mosquitoes in the city; No fogging machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.