Raid on Gambling; Nine men were arrested, including two women | वरली अड्ड्यावर छापा; दोन महिलांसह नऊ जणाना अटक
वरली अड्ड्यावर छापा; दोन महिलांसह नऊ जणाना अटक


अकोला: पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पोलीस पथकाने सोमवारी दुपारी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दतील अब्दुला कॉलनीत सुरू असलेल्या वरली मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला. पोलिसांनी दोन महिलांसह नऊ जणांना अटक केली. हा अड्डा अब्दुल्ला खान नामक व्यक्तीचा असल्याचे समोर आले.
विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांना, खदान परिसरात वरली अड्ड्यावर एक्का-बादशाहच्या नावाने हारजितचा खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी छापा घालून, वरली मटक्याच्या आकड्यावर जुगार खेळणारे बाबर खान अख्तर खान (२९ रा. जिराबावडी खदान), देवेंद्र श्रावण दारोकार (५९ रा. जिराबावडी), आशा राजेश पवार (३८ रा. महात्मा फुले नगर), कमलाबाई नामदेव सुर्वे (५४ रा. शास्त्री नगर खदान), समीर खान जमीर खान (३0 रा. जिराबावडी), तेजस संजय वंजारे (२0 रा. जेतवन नगर), श्रीधर नामदेव श्यामतकार (३७ रा. रामटेकपुरा अकोट), शेख मुनाफ शेख खालिक (५२ रा. इंदिरा नगर), पंजाब सहदेव सदांशिव (५0 रो, महात्मा फुले नगर खदान), लक्ष्मण फकिरा सपकाळ (६५ रा. कैलास टेकडी) यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून रोख २४ हजार २७0 रुपये आणि १४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल फोन जप्त केले. हा वरली अड्डा अब्दुल्ला खान याचा असून, तो फरार झाला आहे.

 

Web Title: Raid on Gambling; Nine men were arrested, including two women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.