शासकीय दरानुसारच उपचार सुविधा उपलब्ध करा; अन्यथा कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:31+5:302021-05-12T04:19:31+5:30

अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी शासकीय दरानुसारच उपचार सुविधा उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र ...

Provide treatment at government rates; Otherwise action! | शासकीय दरानुसारच उपचार सुविधा उपलब्ध करा; अन्यथा कारवाई!

शासकीय दरानुसारच उपचार सुविधा उपलब्ध करा; अन्यथा कारवाई!

Next

अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी शासकीय दरानुसारच उपचार सुविधा उपलब्ध करा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांच्या चालकांना दिला.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ‘ऑनलाइन’ पध्दतीने जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांच्या चालकांची बैठक घेतली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क आकारण्यात यावे, शासकीय दरापेक्षा जास्त दराने शुल्क आकारण्यात येऊ नये, शासकीय दरापेक्षा अधिक दराने उपचार सुविधा उपलब्ध केल्याचे आढळून आल्यास संबंधित कोविड रुग्णालयांच्या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिला. ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डाॅ. कुसुमाकर घोरपडे, डाॅ. मुकुंद अष्टपुत्रे यांच्यासह संंबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन, रेमडेसिविरचा

वापर योग्य पध्दतीने करा!

जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर योग्य पध्दतीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध करावा तसेच आवश्यकतेनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

रुग्णालयांचे फायर ऑडिट करा!

जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांचे तातडीने ‘फायर ऑडिट ’ करून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत संबंधितांना दिले.

Web Title: Provide treatment at government rates; Otherwise action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.