महानिर्मितीचे अध्यक्ष  बिपीन श्रीमाळी यांची पारस औष्णिक विद्युत केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:53 PM2018-05-31T18:53:40+5:302018-05-31T18:53:40+5:30

पारस : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राला ३० मे रोजी भेट दिली.

President of Mahagenco Visit to the Paras Thermal Power Center | महानिर्मितीचे अध्यक्ष  बिपीन श्रीमाळी यांची पारस औष्णिक विद्युत केंद्राला भेट

महानिर्मितीचे अध्यक्ष  बिपीन श्रीमाळी यांची पारस औष्णिक विद्युत केंद्राला भेट

googlenewsNext
ठळक मुद्दे नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल क्रीडांगणाचे उदघाटन बिपीन श्रीमाळी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमानंतर बिपीन माळी यांनी पारस बॅरेजला जाऊन पाण्याची सद्य: स्थिती जाणून घेतली


पारस : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राला ३० मे रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील व्ही.आय.पी. अतिथीगृहालगतच्या योगवाटिकेत वृक्षारोपण केले. या परिसरात लवकरच विविध फळांची ४०० झाडे व बांबूची ११०० झाडे लावण्यात येणार आहेत. पारस वसाहतीतील दवाखान्यासमोरील बाजूस नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल क्रीडांगणाचे उदघाटन बिपीन श्रीमाळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर बिपीन माळी यांनी पारस बॅरेजला जाऊन पाण्याची सद्य: स्थिती जाणून घेतली. सदर दौºयात त्यांनी जुना राख बंधारा, सायलो, कोळसा हाताळणी विभाग, ई.एस.पी. परिसर, पी.सी.आर. इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेल्या अभियंत्यांशी संवाद साधला. ई.एस.पी. परिसरातील उत्तम स्वच्छतेबाबत त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाºयांचे कौतुक केले. सेवा इमारत सभागृहात त्यांनी पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला व त्यानंतर संघटना प्रतिनिधींना भेटून त्यांचे प्रश्न-मागण्या जाणून घेतल्या.
वीज उत्पादनासाठी निर्गुणा प्रकल्पातून पारस औष्णिक विद्युत केंद्रात पाणी पोहचविण्यासाठी स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंता(स्थापत्य) गलगलीकर, सहाय्यक अभियंता फुंडकर व स्थापत्य चमूचे तर गुणवत्ता मंडळाच्या उत्तम कामगिरीबाबत उबरहांडे (कोहावि), वाय. डी. लोखंडे (सी.एन्ड आय) आणि कोल मिलमधील सुधारणांबाबत सोनवणे (बाष्पक परीरक्षण) यांचे श्रीमाळी यांनी विशेष अभिनंदन केले. पारस दौºयानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक (संवसु-१) राजू बुरडे, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) विनोद बोंदरे, पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, उपमुख्य अभियंता एम. पी. मसराम, अधीक्षक अभियंते आर. व्ही. गोरे, एस. एम. पाटील, एस. एम. बोदे, के. एल. माटे, संजय कुºहाडे, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Web Title: President of Mahagenco Visit to the Paras Thermal Power Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.