यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:59 PM2021-05-15T12:59:42+5:302021-05-15T14:52:23+5:30

Akola News : हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.

Pranjal, who passed IAS exam, failed to fight against corona, died during treatment | यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजलची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext
-
ंतोषकुमार गवईपातुर : तालुक्यातील तांदळी येथील प्रांजल प्रभाकर नाकट या यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २५ वर्षीय तरुणाची आठवडाभरापासून सुरू असलेली कोरोनाविरुद्धची झूंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री११:१५ मिनिटांनी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला.प्रांजलचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न अधूरे राहिलेकोरोनामुळे फुफ्फुस बाधित झाल्यानंतर सामान्य कुटुंबातील आईवडिलांनी मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने 55 लाख रुपये जोडून उपचार करण्यासाठी एअर एम्बूलंस द्वारा सोमवारी हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले होते. तेथे उपचाराला प्रतिसाद देत असताना शुक्रवारी प्रांजलचा मृत्यू झाला.पातुर तालुक्यातील तांदळी गावच्या प्रांजल ने जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि कठोर परिश्रमातून यूपीएससी ही परीक्षा पास केली; मात्र गत आठवड्यात प्रांजल ला कोरोनाने गाठले. अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल केल्यानंतर प्रांजल ची तब्येत अत्यंत गंभीर झाली त्यामुळे प्रांजल चे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते जीवन मिळण्याची आशा धूसर होत असताना कृष्णा भाऊ अंधारे तथा आप्तस्वकीयांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून अकोल्याच्या डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या माणसाच्या फुफ्फुस वर काम करणाऱ्या यशोदा हॉस्पिटल चा शोध घेतला आणि संपर्क साधला.तलाठी म्हणून नोकरी करणाऱ्या प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांच्या जिल्हाधिकारी होणाऱ्या एकुलत्या एक प्रांजलच्या उपचारासाठी सत्तावीस लाख रुपये जमा करण्याचं आवाहन होतं अशा परिस्थितीत नातेवाईक यांनी साथ दिली आणि हैदराबाद ची डॉक्टरांची चमू सोमवारी मध्यरात्री दोन वाजता अकोल्यात पोहोचली. त्यांनी ओझोन इस्पितळात तेवढयाच रात्री उपचार सुरु केले आणि प्रांजल ला धोक्याबाहेर काढण्यात आणि तब्येत स्थिर करण्यात यश आले होते. निष्णांत डॉक्टरांच्या चमूने पुढील उपचारासाठी हैदराबादला प्रांजल ला हलविण्याचे सुचवल.यावेळी हेमलाता अंधारे आणि कृष्णा अंधारे यांनी परिवाराला बळ दिले व सोमवारी सकाळी नऊ वाजता अकोल्याच्या विमानतळावर प्रांजल ला घेण्यासाठी ॲम्बुलन्स दाखल झाली होती. सर्वप्रकारची पूर्वतयारी करून हैदराबादच्या पाच डॉक्टरांसह ॲम्बुलन्स द्वारे अवघ्या एका तासामध्ये हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं तेथे डॉ. जिंदाल आणि चमुने प्रांजल वर उपचार केले. बेशुद्ध असलेल्या प्रांजलने बुधवारी डोळे उघडले होते. बाबा आणि दोन्ही काकासोबत प्रांजल ने संवाद साधला.त्याच्या काकांनी लवकरच बरं होउन घरी जाऊ असं सांगितलं.त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु शुक्रवारी दुपारनंतर गुंतागुंत वाढली आणि यातच प्रांजलचा मृत्यू झाला. एअर एम्बूलंस द्वारा अकोल्यातुन हैदराबाद ला परिस्थिती नसताना एकुलत्या एक प्रांजल चे प्राण वाचावे.यासाठी आई अनुराधा नाकट वडील प्रभाकर नाकट आणि तेवढ्याच आर्थिक, आणि मानसिक बळ नातेवाईक यांनी दिले होते. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल च्या एम्बूलंस ने शनिवारी प्रांजल चे पार्थिव अकोल्यात आणण्यात आले.मोहता मिल च्या स्मशानभूमीत त्यांच्या वर मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले

Web Title: Pranjal, who passed IAS exam, failed to fight against corona, died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.