पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:51 PM2020-02-19T14:51:25+5:302020-02-19T14:51:31+5:30

न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Police custody accused of beating up police | पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीस पोलीस कोठडी

Next

अकोला: लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस न्यायालयाच्या परिसरात गांजाची पुडी देणाºया युवकाला पकडण्याचा प्रयत्न करणाºया दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाºया युवकाला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अनुप गणेश परिहार याला १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. यादरम्यान न्यायालय परिसरातून आरोपीला बाहेर नेत असताना पोलिसांच्या व्हॅनमध्ये प्रसाद दत्तात्रय झाडे (२७ रा. वानखडे नगर डाबकी रोड) याने गांजाची पुडी फेकली. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने प्रमोद लांडगे आणि सतीश प्रधान यांना मारहाण केली होती. मारहाणीत दोघे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रसाद झाडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रसाद झाडे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकार तर्फे सहायक सरकारी विधिज्ज्ञ मिनाक्षी बेलसरे यांनी बाजु मांडली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Police custody accused of beating up police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.