पूर्व,दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:51+5:302021-03-07T04:17:51+5:30

काेराेनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. ...

Outbreaks appear to be exacerbated during this time | पूर्व,दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा प्रादूर्भाव

पूर्व,दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा प्रादूर्भाव

Next

काेराेनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यासह शहरातील जीवनमान पुन्हा एकदा प्रभावित झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये काराेनाचा आलेख घसरल्याचे चित्र हाेते. जानेवारीच्या अखेरीस पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेता राज्य शासन सतर्क झाले आहे. राज्यात विदर्भातील अकाेला,अमरावती,वाशिम,बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाने डाेके वर काढल्याचे समाेर येताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. महापालिका क्षेत्रातही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शुक्रवारी काेराेना चाचणी केलेल्या नागरिकांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले असून शहरी भागातील २६७ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.

पूर्व व दक्षिण झाेनमध्ये सर्वाधिक बाधीत

काेराेनाची लागण झालेल्या २६७ रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधीत व्यक्ती पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून आले आहेत. यामध्ये पूर्व झोन- ७१, पश्चिम झोन-५२, उत्‍तर झोन-३९ आणि दक्षिण झोन मध्ये तब्बल १०५ रुग्ण काेराेना बाधित निघाले.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.