कार्यालयातील तक्रारपेट्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:36+5:302021-05-12T04:19:36+5:30

अकोला : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. यामुळे नागरिकांची ...

Office complaint boxes missing | कार्यालयातील तक्रारपेट्या गायब

कार्यालयातील तक्रारपेट्या गायब

Next

अकोला : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तक्रारपेट्या बसविण्याची मागणी होत आहे.

-------------

वीज बिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त

बाळापूर : महावितरण कंपनीकडून वारंवार वीज दरवाढ, अतिरिक्त शुल्क, तर कधी अतिरिक्त सुरक्षा रकमेची देयके पाठविली जात आहेत. या कारभाराने त्रस्त वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.

---------------------------

लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन

अकोला : दहा वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून, पालकांनी लहान मुलांना जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. आपल्यापासून पाल्याला कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

-----------------------------------

बाळापूर तालुक्यात ५१ पॉझिटिव्ह

अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंग‌ळवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यात ५१ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

------------------------------

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

अकोला : अकोट व तेल्हारा तालुक्यांतील काही गावांत व्यायामशाळा नाहीत. व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी युवकांमधून होत आहे. व्यायामशाळा नसल्याने युवकांना व्यायाम करण्यासाठी रस्त्यावर जावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

----------------------

संपूर्ण बंदसाठी पोलीस सज्ज!

अकोला : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तालुक्यात संपूर्ण बंद करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या महामारीच्या संकटाशी लढण्यास पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. तसेच कुणीही विनाकारण बाहेर फिरू नका, असे आवाहनही केले.

----------------------------------

नियम न पाळल्यास कडक कारवाई

पातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे. न. प.च्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर फिरून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. नियम न पाळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

--------------------------------------------

डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका!

हिवरखेड : वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दराचा शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. महागाईमध्ये शेतकरी होरपळून निघत आहे. ट्रॅक्टर मालकांनी शेती मशागतीचे दर वाढविले आहेत. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे करण्याकरिता शेतकऱ्यांना अवास्तव पैसे माेजावे लागत आहेत.

Web Title: Office complaint boxes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.