भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:35+5:302021-06-18T04:14:35+5:30

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते ...

Obstacles due to vegetable handcarts | भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

भाजीपाल्याच्या हातगाड्यांमुळे अडथळा

Next

अकोला : कोरोनामुळे बहुतांश नागरिक भाजीपाला व्यवसायाकडे वळले आहे. अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या हातगाड्या सुरू केल्या आहे. बरेचसे भाजीपाला विक्रेते शहरातील सिंधी कॅम्प चौकात गर्दी करीत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बसस्थानकात कोरोना टेस्ट

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील बसस्थानकात वाढती गर्दी पाहता येथे प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे.

अकोट, अकोला तालुक्यात कमी पाऊस

अकोला : जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोट तालुक्यात ३१.० मिमी तर अकोला तालुक्यात ५६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्यात सर्वाधिक कमी नोंद आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप

अकोला : शहरात रविवारी रात्री दीड तास दमदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र पावसाने विश्रांती घेतली. वातावरणात उकाडा जाणवत होता.

पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी

अकोला : ग्रामीण भागातील नागरिक घरांवर ताडपत्री तसेच प्लॅस्टिक टाकण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे सध्या या दुकानांमध्ये गर्दी होत असून, काही व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दर लावत आहे.

सोशल डिस्टन्स केवळ नावालाच

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे; मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता खरेदी केली जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अकोला : मागील काही दिवसांपासून येणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दवाखान्यातही रुग्णसंख्येत वाढ झाली.

अग्रसेन चौकातील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अकोला : येथील रेल्वे स्टेशन मार्गावरील अग्रसेन चौकातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे चिखल साचला आहे.

वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला

अकोला : कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच आता वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला-ताप यासारखी काही नागरिकांना लक्षणे दिसून लागली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

८० ते १०० मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा!

अकोला : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पेरणी केलेले बियाणे उगवण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक असते, त्यासाठी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय म्हणजे जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Obstacles due to vegetable handcarts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.