अकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:33+5:302021-05-12T04:19:33+5:30

अकोट शहरात दवाखाना, मेडिकल याव्यतिरिक्त सर्व आस्थापने बंद आहेत. बोटावर मोजण्याएवढ्याच किराणा व भोजनालयांतून घरपोच सेवा देण्यात येत ...

Number of corona patients decreases in Akot taluka! | अकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट!

अकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट!

Next

अकोट शहरात दवाखाना, मेडिकल याव्यतिरिक्त सर्व आस्थापने बंद आहेत. बोटावर मोजण्याएवढ्याच किराणा व भोजनालयांतून घरपोच सेवा देण्यात येत आहे. शहरात काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनांची तपासणी व नागरिकांची विचारपूस करण्यात येत होती.

बँका, बाजार समिती व शासकीय कार्यालयांत शुकशुकाट आहे.

रस्त्यावर केवळ पोलीस, रुग्णवाहिका व शासकीय कर्मचारी दिसून येत आहेत. नागरिक लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहेत. लसीकरण व्यवस्था मात्र कोलमडली आहे. लोकांना केवळ लस आल्याची माहिती मिळत असल्याने, लसीकरणासाठी रांगा कायम आहेत. दुसऱ्या डोससाठी लोक ताटकळत आहेत. नोंदणीनुसारच लस राखीव ठेवून डोस देण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके हे लक्ष ठेवून आहेत.

केवळ तीन हजार दंड

महसूल, पोलीस व नगर परिषद पथकाने नियमबाह्य आस्थापना व मास्क वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ व आरोग्य विभाग स्वच्छतेसाठी सरसावला आहे. शहरातील दंडात्मक कारवाईचा आकडा कमी झाला आहे.

शिवभोजनामुळे गरिबांना आधार

शहरातील बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे अनेक गोरगरिबांची भूक अकोट येथील शिवभोजन भागवत आहे. निराधार, निराश्रितांना शिवभोजन पुरवले जात आहे.

ग्रामीणचा व्हॉट्सॲप ग्रुप ॲक्टिव्ह

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी सुरू केलेला कोविड-१९ हा व्हॉट्सॲप ग्रुप गावांची माहिती, सरपंच, पोलीस पाटील यांना आदानप्रदान करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे कोरोनाला अनेक गावांच्या वेशीवरच रोखता आले आहे.

आरोग्य यंत्रणा सरसावली

अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. कोरोना चाचणी व लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर व त्यांच्या अधिनस्त आरोग्य केंद्र कोरोना रुग्णांची संख्या घटविण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे.

Web Title: Number of corona patients decreases in Akot taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.