आता रजत देशी बीटी येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 02:33 PM2019-09-17T14:33:31+5:302019-09-17T14:33:36+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी रजत बीटी कपाशीचे बीजोत्पादन घेण्यात येत आहे.

Now Rajat BT will be coming! | आता रजत देशी बीटी येणार!

आता रजत देशी बीटी येणार!

googlenewsNext

- राजरत्न सिरसाट

अकोला: हायब्रीड कपाशीच्या दोन जातीवर संशोधन करू न बीजी-२ कपाशी बियाणे विकसित केल्यानंतर आता रजत बीटी कपाशीचे संशोधन करण्यात आले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी या बीटी कपाशीचे बीजोत्पादन घेण्यात येत आहे.
दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर पीकेव्ही हायब्रीड-२ व नांदेड-४४ या दोन कपाशी वाणामध्ये बीटी जिन्स टाकून बीजी-२ कपाशी बियाणे विकसित करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासह महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळासोबत संयुक्तरीत्या हे संशोधन करण्यात आले आहे. महाबीजने यावर्षी हे बियाणे बाजारात आणले असून, शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
केंद्रीय कापूस संशोधन (सीआयसीआर) केंद्राने आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रजत कपाशीमध्ये बीटी जिन्स टाकून नवीन बीटी कपाशीचे बियाणे विकसीत केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २००५-०६ मध्ये रजत कपाशीचे बियाणे विकसित केली होते. हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पादन देणाºया या कपाशीची चांगली मागणी वाढली होती. तथापि, विदेशी बीटी कपाशीच्या प्रवाहात हे बियाणे मागे पडले. नागपूरच्या सीआयसीआरने याच रजतमध्ये बीटी जिन्स टाक ला असून, गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक बीटी कपाशी विकसित केली आहे. विशेष म्हणजे रसशोषण करणाºया कि डींना ही बीटी प्रतिबंधक आहे. उत्पादनही हेक्टरी १२ क्विंटलच्यावर देणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षी ही बीटी शेतकऱ्यांना उपलब्ध करू न दिली जाणार असल्याने यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह ठिकठिकाणी बीजोत्पादन घेण्यात येत आहे.खारपणापट्टा तसेच विदर्भाच्या वातावरणासाठी ही बीटी कपाशी अनुकूून आहे.

‘सीआयसीआर’ने कृषी विद्यापीठाच्या रजत कपाशी वाणात जिन्स टाकून बीटी कपाशी विकसित केली आहे. यावर्षी आमच्याकडे बीजोत्पादन घेण्यात येत असून, पुढच्या वर्षी हे बियाणे महाबीजला उपलब्ध करू न दिले जाणार आहे.
- डॉ.डी.टी. देशमुख,
विभाग प्रमुख,
कापूस संशोधन विभाग,
डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

 

Web Title: Now Rajat BT will be coming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.