अकोल्यात कुख्यात गुंड मोनु काकडची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 11:06 AM2020-10-30T11:06:31+5:302020-10-30T11:20:32+5:30

Murder in Akola, Crime News मोनु काकडची अज्ञात मारेकºयांनी दगडाने ठेचून निघृन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

Notorious goon murdered in Akola | अकोल्यात कुख्यात गुंड मोनु काकडची हत्या

अकोल्यात कुख्यात गुंड मोनु काकडची हत्या

Next
ठळक मुद्देआपसी वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असलयाची माहिती आहे.

अकोला : अकोला शहरातील न्य तापडीया नगर भागातील कुख्यात गुंड मोनु काकडची अज्ञात मारेकºयांनी दगडाने ठेचून निघृन हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. न्यू तापडीया नगर भागातील एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. हत्येची माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गजानन उर्फ मोनू काकड हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. न्यू तापडिया नगर परिसरातील रहिवासी  मोनू काकड याच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी  शुक्रवारी पहाटे  धारदार शस्त्र व दगडाने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक मोनू काकड याची अपराधीक पार्श्वभूमी असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असलयाची माहिती आहे. आपसी वैमानस्याहून ही हत्या झाली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम स्थानिक गुन्हे शाखेचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांनी ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहेत याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर घाव असून चेहरा दगडाने ठेचला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. हत्यचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नसले तरी सिव्हिल लाईन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Notorious goon murdered in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.