मैं नहीं.. तु ही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:48 PM2021-02-02T19:48:34+5:302021-02-02T19:49:55+5:30

Mohan Bhagwat News मैं नहीं तुही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य असते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

Not me, but yo also the work of Sangh Swayamsevaks - Mohan Bhagwat | मैं नहीं.. तु ही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य - मोहन भागवत

मैं नहीं.. तु ही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य - मोहन भागवत

Next

अकोला : संघाचे स्वयंसेवक ध्येय, निष्ठेचे व्रत स्वीकारून कार्य करतात. समाजाला जोडणारा, उन्नत करणारा आणि पुढे नेणारा हा धर्म आहे. यशस्वी लोकांचे अनेकजण अनुकरण करतात. समाजासाठी उदाहरण स्वरूप आचरण असले पाहिजे. मैं नहीं तुही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य असते. या उक्तीनुसार शंकरलाल उपाख्य काकाजी खंडेलवाल जीवन जगले. त्यांचे जीवनकार्य उदाहरण स्वरूप आहे. असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शंकरलाल खंडेलवाल जन्मशताब्दी समारोह समितीद्वारे २ फेब्रुवारीला शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी हाेते. यावेळी व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल, स्वागत समिती अध्यक्ष अतुलभाई गणात्रा, सचिव महेंद्र कवीश्र्वर होते.

सरसंघचालक भागवत म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेतानाच, शंकरलाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क आला. एका सामान्य कार्यकर्त्यांसोबत संपर्क, ओळख करण्याची शैली भावनिक होती. संघ कार्यासोबतच मी खंडेलवाल कुटुंबीयांशी कायम जोडला गेलो. अकोल्यात संघाचा प्रचारक म्हणून काम करताना, शंकरलालजी, गीतादेवी यांनी स्नेह दिला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सर्व समाजाला सोबत घेवून आणि ध्येयाप्रती सजग राहून, शंकरलाल खंडेलवाल यांनी संघ कार्यासोबत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्य केले. काम करताना, त्यांना अहंकार कधीही शिवला नाही. यशस्वी लोकांचे म्हणूनच, अनेकजण अनुकरण करतात. समाजासाठी उदाहरणस्वरूप आचरण प्रेरणादायी असे सांगत, त्यांनी शंकरलालजी हे धार्मिक पुरुष होते. संघ, जनसंघ, जनता पार्टीचे काम करताना, त्यांनी मैं और मेरा याचा त्याग केला. स्वत:चे हित न साधणाराच व्यक्ती अनुकरणीय व अनुसरणीय असतो. संघाचा स्वयंसेवक कसा असतो, याचे उदाहरण शंकरलालजी आहेत. स्वत:ला विसरून दुसऱ्यांचा विचार करून मातृवत प्रेम करणारे ते होते. त्यांनी कधीही काेणाची उपेक्षा केली नाही. असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकरलाल खंडेलवाल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या स्मृतिग्रंथाचे विमोचन करण्यात आले. शंकरलाल खंडेलवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट सेवा पुरस्कार गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष विजय जानी, दादा पंत यांनी स्वीकारला. यावेळी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, निशिकांत देशपांडे यांच्या हस्ते अमोल पेडणेकर, स्मृतिग्रंथाच्या लेखिका आरती देवगावकर, पल्लवी अनवेकर, स्वप्निल बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल खंडेलवाल यांनी केले. संचालन प्रा. विवेक बिडवई यांनी केले. आभार अतुलभाई गणात्रा यांनी मानले. वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी सादर केले. कार्यक्रमाला महापौर अर्चना मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मदनलाल खंडेलवाल, रतनलाल खंडेलवाल, डॉ. तारा हातवळणे, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, रामेश्वर फुंडकर, शंतनु जोशी, जयंत मसने, डॉ. नानासाहेब चौधरी, डॉ. अभय पाटील, डॉ. विनायक देशमुख, डॉ. महेंद्र ताह्मणे यांच्यासह संघपरिवारातील मान्यवर उपस्थित होते.

  

Web Title: Not me, but yo also the work of Sangh Swayamsevaks - Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.