मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 05:11 PM2021-11-13T17:11:22+5:302021-11-13T17:13:23+5:30

News of fire at Murtijapur Sub-District Hospital : मिळेल त्या वाहनाने शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

News of fire at Murtijapur Sub-District Hospital | मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ

मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ

Next
ठळक मुद्देमॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर जीव पडला भांड्यात.प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला.

मूर्तिजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात आग लागल्याची वार्ता शहरात सकाळी वाऱ्यासारखी पसरली, आगीच्या घटनेची माहिती कळतच अनेकांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली, या घटनेने शहरात मात्र एकच खळबळ उडाली.
             सर्वत्र शहर शांत असताना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात अचानक आग लागल्याची वार्ता शहरभर पसरली, मिळेल त्या वाहनाने शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली, अर्थात शहरातील काही पत्रकार सुध्दा वृत्तसंकलनासाठी त्या ठिकाणी धावपळ करीत पोहोचले, तेव्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टर व कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत करीत होते, त्यांनीच ही आग आटोक्यात आणली. यासंदर्भात संबधित सहायक वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे यांना ही आग कशामुळे लागली असल्याची माहिती विचारली असता ही आग लागली नसून लावली असल्याचे सांगत ही आमची 'मॉक ड्रिल' होती ती आम्ही काही कालावधीत करत असतो असेही त्यांनी सांगितले, रुग्णालयात अचानक अशी घटना घडली तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग कशी आटोक्यात आणायची याचे प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. येथील रुग्णालयाचे नुकतेच फायर अॉडिट झाले आहे. भविष्यात यंत्रणेने कसे काम करायचे यासाठी ही अकस्मात घटना घडवून आणल्या गेली. मात्र लागलेली आग ही मॉक ड्रिल असल्याचे शेवटी निष्पन्न झाले.

Web Title: News of fire at Murtijapur Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.