‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम : कान्हेरी सरप गावातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 06:44 PM2020-09-16T18:44:34+5:302020-09-16T18:44:44+5:30

आरोग्य पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे.

‘My Family, My Responsibility’ Campaign: Starting from Kanheri Sarap village | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम : कान्हेरी सरप गावातून सुरुवात

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम : कान्हेरी सरप गावातून सुरुवात

Next

अकोला: कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात बार्शीटाकळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कान्हेरी सरप येथून सुरुवात करण्यात आली. आरोग्य पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे.
या माहिमेच्या शुभारंभाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उप-संचालक आरोग्य डॉ. फारुखी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती पंजाबराव अढाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाल भटकर, डॉ. बोबडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मधुकर सरप, डॉ. महेश सरप, प्रतिभा अवचार व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
 
गावात असलेल्या कोमॉर्बीड रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी विकार इ. आजाराची वर्गवारी करून त्यांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल, तरी या मोहिमेमध्ये जनतेने सहभाग नोंदवावा.
- जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी.

 

Web Title: ‘My Family, My Responsibility’ Campaign: Starting from Kanheri Sarap village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.