मूर्तिजापूर: कोविड-१९ लसीकरणाला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:46+5:302021-04-10T04:18:46+5:30

संजय उमक मूर्तिजापूर: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गत काही दिवसांपासून ...

Murtijapur: Short response to Kovid-19 vaccination | मूर्तिजापूर: कोविड-१९ लसीकरणाला अल्प प्रतिसाद

मूर्तिजापूर: कोविड-१९ लसीकरणाला अल्प प्रतिसाद

Next

संजय उमक

मूर्तिजापूर: जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गत काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाला तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत केवळ ७ टक्केच नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात शहरात ७,४६९, ग्रामीण भागात ५,२६८ असे एकूण १२,७३७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन दिली असताना ती घेण्यासाठी नागरिकांचा निरुत्साह दिसून येत आहे.

प्रशासनाने याकरिता शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासणीची व्यवस्था केली आहे. स्वॅब तपासणीला देखील नागरिकांकडून अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात दरदिवशी ठरवून दिलेल्या वेळेत शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी कोविड-१९ प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली आहे; मात्र नागरिकांकडून अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये भीती व अनेक गैरसमज असल्याने लस घेण्यास अनेक जण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. सध्या स्थितीत मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या स्त्री १९९८६, पुरुष २०३०९ अशी एकूण ४०२९५ एवढी आहे, तर ग्रामीण भागातील लोकसंख्या स्त्री ६४९७५,पुरुष ६९३८० एवढी आहे. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या १३४३५५आहे. शहरातील लोकसंख्या ४०२९५ एवढी तर संपूर्ण तालुक्यातील लोकसंख्या१,७४,६५० असतानाही केवळ १२,७३७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रशासन जरी मोठ्या प्रमाणात गाजावाजा करीत असले तरी नागरिकांकडून या लसीकरणाला योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

------------------------------------

नागरिक बेफिकीर, धोका वाढला!

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना तालुक्यातील नागरिक बेफिकीर असल्याचे चित्र आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र आहे. तसेच शहरात बँकेसमोर गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात व जे. बी. हिंदी शाळेत घेण्यात आलेल्या कोरोना तपासणी शिबिरात १५६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये आरटीपीसीआर ५४ व रॅपिड अ‍ँटिजन १०२ तपासण्या करण्यात आल्या. रॅपिड अ‍ँटिजन तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

------------------------------

ग्रामीण भागात आतापर्यंत २२ ठिकाणी कॅम्प घेऊन ५ हजार २६८ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सद्य स्थितीत वॅक्सिन संपुष्टात आल्या असल्याने लसीकरण थांबले आहे. साठा उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण करण्यात येईल.

- डॉ. सुधीर कराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Murtijapur: Short response to Kovid-19 vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.