आंदाेलन, घटना घडामाेडींवर आता ड्राेन कॅमेऱ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 10:16 AM2020-10-30T10:16:47+5:302020-10-30T10:20:25+5:30

Drone Camera's eye on events, Akola News समाजकंटकांवर लक्ष ठेवणयासाठी आता पाेलीस दलात ड्राेन कॅमेरे दाखल झाले आहेत.

The movement, now the drone camera's eye on the events | आंदाेलन, घटना घडामाेडींवर आता ड्राेन कॅमेऱ्याची नजर

आंदाेलन, घटना घडामाेडींवर आता ड्राेन कॅमेऱ्याची नजर

Next
ठळक मुद्देपाेलीस दलात दाेन अत्याधुनिक ड्राेन दाखलपाेलीस कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

- सचिन राऊत

 अकाेला : शहरासह जिल्ह्यात कुठेही आयाेजित करण्यात आलेले माेठे आंदाेलन, माेर्चा, घटना, घडामाेडींवर लक्ष ठेवणयासाठी तसेच बारीक हालचाली टिपण्यासाठी आता अकाेला पाेलीस दलात दाेन ड्राेन कॅमेरे दाखल झाले आहेत. या ड्राेन कॅमेऱ्यांव्दारे या घटनांवर लक्ष ठेवणयात येणार असून, त्यासाठी काही पाेलीस कर्मऱ्यांना ड्राेन कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षणही देणयात येणार असल्याची माहिती आहे.

राजकीय पक्षाचे किंवा काेणत्याही समाजाचे आंदाेलन, माेर्चा, पुतळा जाळणे तसेच माेठ्या घटना घडामाेडींवर लक्ष ठेवणयासाठी पोलीस प्रशासनाकडून छायाचित्रीकरण करण्यात येते; मात्र हे चित्रीकरण करताना केवळ समाेरच्यांंचेच चेहरे त्यामध्ये येतात. पाठीमागील आंदाेलनकर्त्यांकडून नेहमीच वाद करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक वादग्रस्त व समाजात वाद लावून देणाऱ्या समाजकंटकांवर लक्ष ठेवणयासाठी आता पाेलीस दलात ड्राेन कॅमेरे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक घटना, घडामाेडीसह आंदाेलन व माेर्चाच्यावेळी या ड्राेन कॅमेऱ्यांव्दारे नजर ठेवणयात येणार आहे. यासाठी कमर्चाऱ्यांनाही प्रशिक्षण देणयात येणार असल्याची माहिती आहे.

 

समाजकंटकांवर राहणार बारीक लक्ष

आंदाेलन, माेर्चा, पुतळा जाळणे यासह सामाजिक ॲक्टिव्हीटी असलेल्या ठिकाणी काही समाजकंटक त्यांच्या राजकीय फायद्यासाठी जातीय दंगल भडकाविणयाचा प्रयत्न करतात. त्यामुळे या समाजकंटकांवर ड्राेन कॅमेऱ्याव्दारे आता बारीक लक्ष ठेवणयात येणार आहे. यासाेबतच घटना आणि घडामाेडींवरदेखील या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

हायटेक करणयाचा प्रयत्न

पाेलीस दल आता हायटेक हाेणयाचा प्रयत्न करीत आहे. आधी साधे कॅमेरे वापरत असताना आता ड्राेन कॅमेेरे तसेच अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून पाेलीस प्रशासन कात टाकत आहेत. याव्दारेच गुंड, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पाळत ठेवणयाचे काम करणयात येत आहे. ड्राेन कॅमेरे, अत्याधुनिक कॅमेऱ्यांसह विविध हायटेक उपकरणांचा वापर करून पोलीस प्रशासन हायटेक हाेणयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Web Title: The movement, now the drone camera's eye on the events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.