कोरोनापेक्षा उच्चरक्तदाब, मधुमेह अन् किडनी विकाराचेच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:49 AM2020-10-13T10:49:29+5:302020-10-13T10:49:44+5:30

Akola News उच्चरक्तदाब, मधुमेह, किडणीसह इतर आजाराचे तब्बल २३,३३९ रूग्ण, तर कोरोनाचे केवळ ९०४ संदिग्ध रूग्ण आढळले आले आहेत.

More than corona, high blood pressure, diabetes and kidney disease! | कोरोनापेक्षा उच्चरक्तदाब, मधुमेह अन् किडनी विकाराचेच अधिक !

कोरोनापेक्षा उच्चरक्तदाब, मधुमेह अन् किडनी विकाराचेच अधिक !

Next

अकोला: माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्'ातील १० लाख १७ हजार ७३३ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्चरक्तदाब, मधुमेह, किडणीसह इतर आजाराचे तब्बल २३,३३९ रूग्ण, तर कोरोनाचे केवळ ९०४ संदिग्ध रूग्ण आढळले आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्'ात १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा पहिला टप्पा राबविण्यात आला. या अंतर्गत ग्रामीण भागातील २ लाख २८ हजार ९२९ कुटुंबातील १० लाख १७ हजार ८३३ नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. हे सर्व्हेक्षण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले, मात्र यामध्ये कोरोनाच्या संदिग्ध रूग्णांपेक्षा उच्चरक्तदाब, मधुमेह अन् किडणीसह इतर विविध आजारांनी ग्रस्त रूग्णांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. ग्रामीण भागात २३, ३३९ नॉन कोविड रूग्ण आढळून आले, तर कोरोनाचे केवळ ९०४ संदिग्ध रूग्ण आढळून आले असून, यामध्ये सारी आणि सर्दीचे २२९, तापाचे ४२१, तर रक्तामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या २५४ रूग्णांचा समवेश आहे. या रूग्णांवर आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपचार करण्यात येत असून, गरजेनुसार रूग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित करण्यात आले आहे.

 आॅक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या दुसºया टप्प्यास १४ आॅक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. २४ आॅक्टोबरपर्यंत चालणाºया मोहिमेच्या या टप्प्यात एक पथक दररोज ५० घरांना भेट देणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात १०७४ आणि नगर परिषद क्षेत्रात १५१, अशा एकूण १, २२५ चमू कार्यरत होत्या. १२२ पर्यवेक्षकांच्या नियंत्रणाखाली आणि ३७ रूग्णवाहिकांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी राबविण्यात आली. पाच लाख लोकांची अ‍ॅपमध्ये नोंद मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय तपासणीनंतर जिल्'ातील ५ लाक ९० हजार ३३६ जणांची नोंद अ‍ॅपमध्ये नोंद करण्यात आली.

Web Title: More than corona, high blood pressure, diabetes and kidney disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.