देगाव येथील बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:22 AM2021-03-01T04:22:10+5:302021-03-01T04:22:10+5:30
---------------------- पिंपळखुटा परिसरात भुईमूग बहरला पिंपळखुटा: शेतशिवारात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढला असून, सद्यस्थितीत पीक बहरले आहे. गतवर्षी खरीप हंगामात ...
----------------------
पिंपळखुटा परिसरात भुईमूग बहरला
पिंपळखुटा: शेतशिवारात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढला असून, सद्यस्थितीत पीक बहरले आहे. गतवर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. भुईमूगाचे पीक बहरले असून, चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे.
-------------------------
योग योगेश्वर संस्थांमध्ये विजय ग्रंथाचे पारायण
वरूर जऊळका: संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त दि. १ मार्चपासून योग योगेश्वर संस्थांनमध्ये गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. गजानन विजय ग्रंथाचे वाचक हभप वैभव महाराज वसू यांच्याकडे आहे.
----------------------------
जय बजरंग विद्यालयात विज्ञान दिन
कुंभारी: येथील जय बजरंग विद्यालय माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विलास इंगळे, तर प्रमुख अतिथी अमरावती विभागीय विज्ञाान परिषदेचे अध्यक्ष रवींद्र भाष्कर, सुनील फोकमारे, धनंजय पुसेगावकर, प्रा.शारदा उमाळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
-------------------------