मराठा आरक्षण रद्द; विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:08+5:302021-05-07T04:20:08+5:30

------------------ गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्त्याही रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक ...

Maratha reservation canceled; Disappointment of students | मराठा आरक्षण रद्द; विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

मराठा आरक्षण रद्द; विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग

googlenewsNext

------------------

गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्त्याही रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक उमेदवारांच्या नियुक्त्या गेल्या २ वर्षांपासून रखडल्या आहेत, त्यांची यात काहीच चूक नसताना अशा विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे.

- गोपाल काळे पाटील, विद्यार्थी.

----------------

मराठा समाजाला दर्जाची व संधीची समानता कोठे आहे, मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका शैक्षणिक क्षेत्राला अधिक बसणार आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मुख्यत्वे सर्व क्षेत्राचा श्वास असणारे शैक्षणिक क्षेत्रात होणारी हानी समाजाला दुर्बल बनवेल. मराठा समाजातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थी यांना आरक्षण गरजेचे आहे.

-अक्षय राऊत, साथ सेवक फाउंडेशन.

----------------

मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील मुलींची खूप मोठी हानी झाली आहे. आरक्षण मुद्द्यावर निव्वळ राजकारण झाले आहे. मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षण महत्त्वाचे असून, आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-प्रांजली देशमुख, विद्यार्थी.

----------------

मराठा आरक्षण रद्द होण्यास सरकार जबाबदार असून मराठा आरक्षणावर निवड राजकारण होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आरक्षण हे गरजेचे असून, सरकारने लक्ष घालून आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा.

- गौरी सरोदे, विद्यार्थी.

-----------------

बुधवार दि. ५ मे रोजी न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाचे हे आरक्षण रद्द केल्याने आरक्षणाच्या मुद्द्याकडे अत्यंत आशेने पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. हे आरक्षण रद्द झाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम भविष्यात खूप मोठे संकट उभे करेल. म्हणून आरक्षण गरजेचेच!

- जया मांजरे, विद्यार्थी.

Web Title: Maratha reservation canceled; Disappointment of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.