Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:03 AM2019-09-18T04:03:53+5:302019-09-18T04:04:51+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- सेना वगळता मित्रपक्षाच्या वाट्याला अवघ्या १३ ते १८ जागा येण्याची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha 2019 -Expectations for rasap, Shiv Sangam increased | Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

Next

- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मिशन २२० प्लस हाती घेतले असून, मित्रपक्षांना सोबत ठेवणार, अशी ग्वाही वेळोवेळी दिली आहे; मात्र जागा वाटपाच्या समीकरणांमध्ये सेना वगळता मित्रपक्षाच्या वाट्याला अवघ्या १३ ते १८ जागा येण्याची शक्यता आहे. शिवसंग्राम व रासप या दोन पक्षांच्या गत वर्षभरात वाढलेल्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेता महायुतीच्या या संभाव्य जागा वाटपात त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे व रासपचे नेते दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी महायुतीचा घटक पक्ष म्हणून संपूर्ण कार्यकाळात भाजपाची पाठराखण केली तसेच आपापल्या पक्षांची बांधणी करून विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे. शिवसंग्राम व रासप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १२ जागांवर दावा केला असून, रिपाइं आठवले गट, रयत स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांनाही मतदारसंघ हवे आहेत. त्यामुळे १३ ते १८ जागांमध्ये या मित्रपक्षांचे समाधान करणे शक्य नसल्याचे स्पष्टच आहे. शिवसंग्रामला गत विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीडमध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व अकोल्यातील बाळापुरात ऐनवेळी शिवसंग्रामऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. दुसरीकडे मेटे यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवित पूर्ण चार वर्षे झुलवित ठेवले व नंतर शिवस्मारकाची जबाबदारी देत बोळवण केली.
या पृष्ठभूमीवर शिवसंग्रामने १२ जागांचा दावा रेटून धरला आहे. रासपने गतवेळी कन्नड, कमळनुरी, गंगाखेड, दौंड, अहमदपूर व बुम परगणा अशा सहा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दौंडची जागा जिंकून रासपने आपले अस्तित्व कायम ठेवले होते. या निवडणुकीत १२ मतदारसंघांमध्ये रासपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामध्ये विदर्भातील अकोट व बाळापूर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 -Expectations for rasap, Shiv Sangam increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.