कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 06:00 PM2019-07-21T18:00:53+5:302019-07-21T18:01:33+5:30

महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.

Lotus birds not get shelter: freshwater reservoirs On the way to ending | कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

कमळ पक्ष्यांना आसरा मिळेना: गोड्या पाण्याचे जलसाठे संपण्याच्या मार्गावर

Next

- राजेश शेगोकार

अकोला: मान्सूनच्या लहरी पणाचा मानवासोबतच पशुपक्ष्यांनाही फटका बसला आहे. पावसाने दिलेला खंड व खालावलेली जलपातळी यामुळे अनेक गाव तलाव कोरडे पडले असून, काही तलावच गाळामुळे नामशेष होत आहेत. त्यामुळे गोड्या पाण्याच्या काठी अधिवास कारणाºया पाण मयूर हे पक्षी सध्या आसºयासाठी कासावीस होत असल्याचे चित्र आहे. पाणपिपुली, पीयू, पीयूष, जलमयूर, पाणमयूर किंवा कमळपक्षी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाºया या सुंदर पक्ष्याचे जलीय परिसंस्थेशी अतूट नाते आहे. महाराष्ट्रातील गोड्या पाण्याचे तलाव यांचा आवडीचा अधिवास आहे; मात्र आता तलावच कोरडे पडल्याने अशा तलावांच्या आसºयाने राहणारे मनमोहक पाणपक्षीदेखील संकटात सापडले आहे.
मालगुजारी तलाव व इंग्रजांच्या दूरदृष्टीमुळे अनेक शहरे व गावालगत तलावाची निर्मिती केली. अनेक परदेशी स्थलांतरित पक्ष्यांसह स्वदेशी पक्ष्यांचेदेखील हे तलाव माहेरघर बनले. आता मात्र लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराने व वाढत्या शहरीकरणामुळे तलावाच्या सौंदर्याला घरघर लागली. अमरावती जिल्ह्यातील छत्री, वडाळी तलाव, नागपूर जिल्ह्यातील फुटाळा, सोनेगाव, अंबाझरी तर वाशिम जिल्ह्यातील ऋषी तलाव हे उत्तम उदाहरण आहेत. अमरावती शहरालगतचा छत्री व वडाळी तलाव पूर्वी लाल व पांढºयाशुभ्र कमळ फुलांनी बहरून जायचा. येथील शेकडो कमळ पक्ष्यांसाठी नंदनवन म्हणून हा तलाव ओळखला जायचा. छत्री तलाव येथे झालेल्या विकासाकामुळे येथील कमळ पक्ष्यांची संख्या नाहीशी झाली आहे. विशेष म्हणजे जिथे पाणी आहे त्या तलावांमधील कमळ व इतर पाणपुष्प वनस्पतींचा नाश होत आहे. त्यांची जागा आता जलपर्णीसारख्या इतर विषारी प्रदूषणसूचक वनस्पतीने घेतली आहे. त्यामुळे जलप्रदूषणाने गुदमरत असलेल्या इतर जलाशयात कमळ पक्ष्यांचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे.

 
कमळ पक्ष्यांच्या वसाहती मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आल्या आहेत. अनेक तलावातील कमळ नष्ट झाल्याने कमळ पक्ष्यांची संख्या प्रचंड घटली आहे. म्हणून स्थानिक तलावातील विकासकामे कमळपुष्प आणि कमळ पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा नव्याने तलावातील गाळ काढून, प्रदूषण कमी करून नैसर्गिकरीत्या कमळ वनस्पती वाढवली तर कमळ पक्ष्यांना अधिवास मिळेल.
-@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,

 

Web Title: Lotus birds not get shelter: freshwater reservoirs On the way to ending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.