लॉकडाउन'मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:21 PM2020-03-24T23:21:16+5:302020-03-24T23:22:32+5:30

लॉकडाउन'मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील - जिल्हाधिकारी

Lockdown : essential supplies will permanently - Collector | लॉकडाउन'मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील - जिल्हाधिकारी

लॉकडाउन'मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील - जिल्हाधिकारी

Next
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला आहे. *_या काळात सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील_*. घाबरू नये, दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे . राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. *21 दिवसाच्या कर्फ्यूमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यावर , जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.* याबाबत सर्व जनतेला आश्‍वस्त करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कृपया कोणीही पॅनिक होऊ नये. सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी .घरातच राहावे .घराबाहेर कृपया पडू नये . कोरोनाबरोबर आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे,असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.              

Web Title: Lockdown : essential supplies will permanently - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.