महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:11 AM2020-07-27T10:11:00+5:302020-07-27T10:11:46+5:30

कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला.

A liquor party at Calcutta Dhaba on the highway; 35 arrested | महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

महामार्गावरील कलकत्ता ढाब्यावर दारूची पार्टी; ३५ जण अटकेत

Next
ठळक मुद्दे३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.


अकोला : शहराच्या लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध कलकत्ता ढाब्यावर रंगलेल्या दारूच्या पार्टीवर रविवारी रात्री पोसिलांनी छापा टाकून ३५ जणांना अटक करुन लाखोंच्या मुद्देमाल जप्त केला.
कोरोनामुळे गत तीन महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरण्ट्स, वाइन बार बंद असल्यामुळे मध्यपींचे चांगलेच वांदे झालेले असताना त्यांच्यासाठी बेकायदेशीररित्या दारूचा साठा उपलब्ध करणे तसेच दारू पिण्यासाठी विशेष व्यवस्था करून देणाऱ्या कलकत्ता ढाब्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. या ढाब्यावर दारूच्या पार्ट्या रंगतात अशी माहिती विशेष पथकाला होतीच मात्र त्यांनी या माहितीची खातरजमा केल्यानंतर पंधरा दिवस पाळत ठेवली. माहितीमधील सत्यता समोर आल्यावर रविवारी रात्री उशिरा कलकत्ता ढाब्यावर छापेमारी केली. या छापेमारीत दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला. तसेच या दारूची विक्री करणाºया ३५ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये जगदीप जसवंतसिंह ढालीवाल, वय ३१ वर्षे रा.कलकत्ता ढाबा, संतोष श्रीराम नागरे, वय ३३ वर्षे, रा.भारती प्लॉट याळापूर नाका,उमेश नागोराव अंधारे, वय ३९ वर्षे, रा.भिरड वाडी बाळापूर रोड, राहूल विजय जांगडे, वय ३६ वर्षे, रा.जुने शहर हरीहर पेठ, कमलेश मधूकरराव भरणे, वय ३५ वर्षे रा.शिव नगर जुने शहर, स्वप्नील रामदास इंगळे, वय ३० वर्षे, रा.कनाल रोड बाळापूर नाका, संदिप सुनील वानखडे, वय ३७ वर्षे रा.शिव नगर बाळापूर नाका, ललील दत्तात्रय झारकर, वय ३७ वर्षे रा.भारती प्लॉट बाळापूर नाका, आशीष प्रकाश सोसे, वय ३५ वर्षे रा.भारती प्लॉट जुने शहर, सुरज डीगांबर राजुरकर, वय २० वर्षे रा.खरप रोड दमाणी हॉस्पीटल, सुरज शंकर कराळे, वय ३४ वर्षे रा.पारस वियूत कॉलनी, ता.बाळापूर, जितेंद्र रमेश जांगळे, वय ३८ वर्षे रा.हरीहर पेठ, राहूल अशोक बुंदेले, वय २४ वर्षे रा शिवनगर पाण्याच्या टाकीजवळ, गणेश केशवराव अटाळे, वय ३० वर्षे रा.शिवनगर, सचीन ज्ञानेश्वर गोतमारे, वय ३१ वर्षे रा.शिवनगर, मोहमंद शाहरूख मोहंमद फारूख, वय २६ वर्षे रा.हमजा प्लोट, आशुतोष प्रफुल बोदडे, वय १९ वर्षे रा.सहकार नगर गौरक्षण रोड, शुभम श्रीराम काटकर, वय २० वर्षे रा.वानखडे नगर, शेख शहजाद शेख नसीरोदिने वय २२ वर्षे रा पातूर, अब्दूल कलीम अब्दूल मुतलीब वय ३५ वर्षे रा गंगानगर वाशीम बायपास, गोपाल रमेश ढगे, वय २६ वर्षे रा.रिधोरा, गजानन देवीदास उईके, वय ३५ वर्षे रा.भारती प्लॉट शिवनगर. गणेश उत्तमराव भोगरे, वय ५५ वर्षे रा.भारती प्लॉट, आशीष जनार्दन मोहोकार, ३३ वर्षे रा.दिवेकर पोस्ट आॅफीसजवळ, जटारपेठ, मोहंमद शकील मोहंमद नजीर, वय ३४ वर्षे रा.बैधपूरा, विशाल दिनकर सोळणके, वय ३० वर्षे रा.रिधोरा, शैलेश सिताराम बाणीय, यय ३४ वर्षे रा.माळीपूरा चौक, पियुष राजेश पोपट, वय ३१ वर्षे रा.माणेक टॉकीज जवळ, रवी परशराम लखवानी, ३८ वर्षे रा.सिंधी कॅम्प, प्रतीक कैलाश रत्नपारखी, वय २३ वर्षे रा.डाबकी रोड, राजेश दामोधर तळोणे, वय ४० वर्षे रा.डाबकी रोड फडके नगर, सुभाष जोखनलाल विश्वकर्मा वय ३४ वर्षे रा.विठठल नगर मोठी अमरी, पंकज रामचंद्र विश्वकर्मा वय २९ वर्षे रा विठठल नगर मोठी उमरी, सैयद रियाजोद्दीन सैयद नसिरोरोदिन वय ३२ वर्षे रा.सोळाशे प्लॉट इंदीरा नगर, मोहीमोदीन कमोरोद्दीन वय १८ वर्ष, डाबकी रोड फळके नगर यांचा समावेश आहे.  बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराकडे बाळापूर पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची ही चर्चा आता जोरात सुरू आहे.


आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
कोरोना च्या संकटात दारूची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आलेले आहेत. मात्र उत्पादन शुल्क विभाग मूग गिळून असल्याने पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून कारवाईचा सपाटा सुरूच आहे. अशातच रविवारी रात्री केलेली कारवाई ही आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जाते.

Web Title: A liquor party at Calcutta Dhaba on the highway; 35 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.