४,७०१ फॉल्टी मीटरद्वारे महावितरणला लाखोंचा गंडा !

By Atul.jaiswal | Published: May 19, 2022 10:41 AM2022-05-19T10:41:59+5:302022-05-19T10:43:33+5:30

MSEDCL NEWS : आतापर्यंत ४,७०१ हजार ग्राहकांचे फॉल्टी मीटर बदलण्यात आले असून, याद्वारे एकून २९,२१३४ युनिट वाढले आहेत.

Lakhs of rupees to MSEDCL through 4,701 faulty meters! | ४,७०१ फॉल्टी मीटरद्वारे महावितरणला लाखोंचा गंडा !

४,७०१ फॉल्टी मीटरद्वारे महावितरणला लाखोंचा गंडा !

Next
ठळक मुद्देमीटर बदलल्यानंतर वाढले वीज युनिट महसुलात पडणार मोठी भर

-अतुल जयस्वाल

अकोला : वीज मीटरमध्ये हेरफेर करून महावितरणला लाखो रुपयांनी चुना लावण्याचे प्रकार समोर आल्यानंतर महावितरणकडून संबंधित ग्राहकांचे असे फॉल्टी मीटर बदलून नवे मीटर बसवून देण्यात आले आहेत. महावितरणच्या अकोला मंडळात जानेवारी २०२२ ते मे २०२२ या कालावधीत आतापर्यंत ४,७०१ हजार ग्राहकांचे फॉल्टी मीटर बदलण्यात आले असून, याद्वारे एकून २९,२१३४ युनिट वाढले आहेत.

 

आधीच अब्जावधी कोटींची थकबाकी असल्याने महावितरण अडचणीत आले असताना वीज ग्राहक वीजचोरीचे वेगवेगळे प्रयोग करून महावितरणला चुना लावत आहेत. त्यात मीटर बायपास करणे, तारांवर आकडे टाकणे, सर्किटमध्ये फेरफार करण्यासह मीटरमध्येही फेरफार करून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे प्रत्यक्ष होणारा विजेचा वापर कळत नाही. त्याचा फटका महावितरणला बसतो. असे प्रकार उघड करण्यासाठीही महावितरणकडून माेहीम राबवली जाते. यावर उपाय म्हणून महावितरणने अशा ग्राहकांचे मीटर काढून नवीन मीटर बसवून देण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे वीजगळतीचे प्रमाण कमी होऊन महावितरणच्या महसुलाची हानी टळली आहे.

 

 

तालुकानिहाय बदलले फॉल्टी मीटर आणि युनिटमध्ये झालेली वाढ

 

तालुका - बदली मीटर - युनिटची वाढ (लाखांत)

 

अकोला शहर - १६६७ - ८२३६१

अकोला ग्रामीण - ५२४ - ३६२९२

बाळापूर - ३५७ - २२३६८

बार्शीटाकळी - ७५८ - ३३९६४

अकोट - ४८२ - १९७०४

तेल्हारा - १६७ - १९०२९

पातूर - ३२३ - ४४७९६

मूर्तिजापूर - ५२३ - ३३६२०

मीटर बदलल्यानंतर २.९२ लाख युनिटची वाढ

मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरीचा प्रकार अनेक ठिकाणी होतो. त्यामुळे प्रत्यक्ष विजेचा वापर कळत नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात आढळलेले ४,७०१ ‘फॉल्टी’ मीटर महावितरणकडून बदलण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष विजेच्या वापरात २,९२,१३४ लाख युनिटची वाढ दिसली.

 

काही ग्राहकांच्या स्वत:ही तक्रारी

 

महावितरणला गुंगारा देण्यासाठी बहुसंख्य ग्राहक वीज मीटरमध्ये फेरफार करीत असले तरी काही ग्राहकांचा प्रत्यक्ष वीज वापर कमी असताना ‘फॉल्टी’ मीटरमुळे त्यांना सरासरी देयक आकारले जाते. हा भुर्दंड वाचवण्यासाठी संबंधित ग्राहकांनी स्वत:ही तक्रारी करून मीटर बदलून घेतले.

 

सर्वाधिक नुकसान अकोला शहरात

अकोला शहरात सर्वाधिक वीजचोरी होत असल्याचे समोर आले आहे. गत पाच महिन्यांत शहर विभागातील तीन उपविभागांमध्ये १६६७ ग्राहकांचे फॉल्टी मीटर बदलवून देण्यात आले आहेत. यामुळे तब्बल ८२,३६१ युनिटची वीजचोरी वाचविण्यात महावितरणला यश आले आहे.

Web Title: Lakhs of rupees to MSEDCL through 4,701 faulty meters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.