जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाचा पत्रकारांनी केला निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:51 PM2019-01-02T12:51:35+5:302019-01-02T12:53:19+5:30

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या उद्दाम व उर्मट वागणुकीचा मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकारांच्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला

journalists in Akola condemend  District Collector's behavior | जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाचा पत्रकारांनी केला निषेध!

जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्तनाचा पत्रकारांनी केला निषेध!

Next

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या उद्दाम व उर्मट वागणुकीचा मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकारांच्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला. या कृत्याचा सामूहिक निषेध करण्यासाठी ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच निषेध सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांनी केलेल्या उर्मट वर्तनाबद्दल समज देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काल सोमवारी शहरातील काही संपादक व पत्रकारांना आपल्या शासकीय बंगल्यावर बोलावून पत्रकारांना दूषित पाणी देऊन उद्दामपणा दाखवित उर्मटपणाने त्यांचा अपमान केला. या घटनेचे जिल्ह्याच्या माध्यम क्षेत्रात तीव्र प्रतिसाद उमटले. अकोला जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने स्थानिक पत्रकार भवनात तातडीने आज सर्व पत्रकार संघटनांच्या पत्रकारांची बैठक आयोजित केली होती. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. त्यावेळी पत्रकार राजेश शेगोकार, नीलेश जोशी व पद्माकर आखरे यांनी घटनेची माहिती सभेपुढे ठेवली. अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी बैठकीचे संचालन केले. या बैठकीला पत्रकार सुधाकर खुमकर, गजानन सोमानी, संजय खांडेकर, जावेद झकेरिया, राजू उखळकर, सूर्यकांत भारतीय, उमेश अलोने, अविनाश राऊत, शैलेश अलोने, माणिक कांबळे, राजेंद्र श्रीवास, देवीदास चव्हाण, संजय अलाट, विवेक मेतकर, सुधाकर देशमुख, अता कुरेशी, संजय चक्रनारायण, हर्षदा सोनोने, शंतनू राऊत, गणेश सोनोने, समीर ठाकूर, राजेंद्र काकडे, मो. साकीब, जीवन सोनटक्के, अक्षय गवळी, नीलेश पोटे, रोशन शेख, कमलकिशोर शर्मा, धनंजय साबळे, मधू कसबे, नितीन गव्हाळे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांचे ५० ते ६० पत्रकार उपस्थित होते. सर्व प्रमुख १६ संघटनांचा सहभाग असलेल्या पत्रकार हल्ला कृती समितीच्या बॅनरखाली ही निषेध सभा होणार आहे. तातडीचा निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांनी गठित केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून सर्व पत्रकारांनी बाहेर पडत निषेध नोंदविला.

 

Web Title: journalists in Akola condemend  District Collector's behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.