वीज कापली तर वंचित बहुजन आघाडी जाेडून देईल : ॲड. आंबेडकर यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 02:28 PM2020-11-21T14:28:42+5:302020-11-21T14:29:16+5:30

Prakash Ambedkar News ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेत थेट सरकारलाचा इशारा दिला आहे

If the power is cut off, We will connected it: Adv. Ambedkar's warning to the government | वीज कापली तर वंचित बहुजन आघाडी जाेडून देईल : ॲड. आंबेडकर यांचा सरकारला इशारा

वीज कापली तर वंचित बहुजन आघाडी जाेडून देईल : ॲड. आंबेडकर यांचा सरकारला इशारा

Next

अकाेला: वीज बिल भरण्याची सक्ती हाेत असेल तर काेणीही वीज बिल भरू नये. ज्यांची वीज कापल्या जाईल त्यांची वीज जाेडून देण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत असल्याची भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेत थेट सरकारलाचा इशारा दिला आहे

अकाेल्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की वीज बिलासंदभात सरकारच्या धाेरणाचा निषेध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी वंचितने अकाेल्यात आंदाेलन केले हाेते. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे काेणीही वीज बिल भरू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पाताेडे यांच्यासह वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, गजानन गवई, जि.प. सदस्य रामकुमार गव्हाणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डाॅ. प्रसन्नजित गवई, पराग गवई, विकास सदांशिव आदी उपस्थित हाेते.

 

मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय पालकांच्या मर्जीवर

राज्य शासनाने साेमवारपासून ९ ते १२ पर्यंतचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय पालकांवर साेपविण्यात यावा. एखादा विद्यार्थी शाळेत येत नसेल व ऑनलाइन धडे घेत असेल तर त्याची उपस्थिती गृहीत धरण्यात यावी, असेही आंबेडकर म्हणाले.

Web Title: If the power is cut off, We will connected it: Adv. Ambedkar's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.