हिमोफिलियाच्या रुग्णांना लॉकडाऊनचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:26 PM2020-08-02T16:26:22+5:302020-08-02T16:26:44+5:30

नियमित औषध पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागातील हिमोफिलियाच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे.

Hemophilia patients hit by lockdown! |  हिमोफिलियाच्या रुग्णांना लॉकडाऊनचा फटका!

 हिमोफिलियाच्या रुग्णांना लॉकडाऊनचा फटका!

googlenewsNext

अकोला : रक्ताशी निगडित ‘हिमोफिलिया’ आजारावर राज्यात मोजक्याच शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे; परंतु त्या ठिकाणीही रुग्णाला आवश्यक फॅक्टरचे इंजेक्शन मिळेलच, असे नाही. अशातच लॉकडाऊनमुळे नियमित औषध पुरवठा न झाल्याने ग्रामीण भागातील हिमोफिलियाच्या रुग्णांना याचा मोठा फटका बसला आहे.
‘हिमोफिलिया’ हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभावतो. अशा रुग्णाला योग्य वेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी राज्यात विभाग स्तरावर डे केअर युनिट सुरू करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. तर अकोल्यातही नुकतेच या हिमोफिलिया डे-केअर युनिटचे उद््घाटन करण्यात आले; परंतु या ठिकाणी मुबलक औषधे उपलब्ध नसल्याचेही वास्तव आहे.

ही आहेत हिमोफिलियाची लक्षणे
हिमोफिलियाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे रक्तस्त्राव.
हा रक्तस्त्राव अंतर्गत (डोळ्यांना न दिसणारा) असू शकतो.
कोणत्याही स्पष्ट कारणाविना रक्तस्त्राव होऊ शकतो.
हिमोफिलिया असलेल्या रुग्णांना इतरांच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणात किंवा वेगगाने रक्तस्त्राव होत नाही, उलट त्यांच्या रक्तस्त्राव दीर्घकाळपर्यंत चालू राहतो.

हिमोफिलियाचे दोन प्रकार
हिमोफिलिया या आजाराचे ए आणि बी असे दोन प्रकार आहेत. हिमोफिलिया ए या प्रकारात फॅक्टर आठचा संपूर्ण अभाव किंवा कमतरता असते. तर हिमोफिलिया बीमध्ये अ‍ॅक्टर -९चा संपूर्ण अभाव किंवा कमी असते. हिमोफिलिया आजाराचे वर्गीकरण सौम्य, मध्यम व तीव्र असे केले जाते.


अकोल्यात हिमोफिलिया डे-केअर युनिटला सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला; परंतु औषधांचा तुटवडा हा गंभीर प्रश्न आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सैय्यद कयुम सैय्यद नूर, उपाध्यक्ष, हिमोफिलिया सोसायटी, अकोला

 

Web Title: Hemophilia patients hit by lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.