हाफकीनकडून वर्षभरात दहा टक्केच सर्जिकल साहित्याचा पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:02 PM2019-12-15T12:02:18+5:302019-12-15T12:07:49+5:30

गत वर्षभरात हाफकीनकडून राज्यभरात केवळ दहा टक्केच सर्जिकल साहित्य पुरविण्यात आले, तर मॅनीटॉल, आयसोलेट-पी सारख्या सलाईनचा पुरवठाच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Halfkin supplies only ten percent of surgical supplies a year! | हाफकीनकडून वर्षभरात दहा टक्केच सर्जिकल साहित्याचा पुरवठा!

हाफकीनकडून वर्षभरात दहा टक्केच सर्जिकल साहित्याचा पुरवठा!

Next
ठळक मुद्दे हाफकीनमार्फत खरेदी प्रक्रियेमुळे वार्षिक खर्च हजार कोटीच्यावर गेला आहे.केवळ ३० टक्के औषधं, तर १० टक्केच सर्जिकल साहित्याचा पुरवठा.काही कंपन्या हाफकीनला वेळेत पुरवठा करत नसल्याचे समोर आले आहे.

- प्रवीण खेते
अकोला : सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागासाठी आवश्यक औषध, सर्जिकल साहित्याची खरेदी हाफकीनकडून केली जाते; मात्र गत वर्षभरात हाफकीनकडून राज्यभरात केवळ दहा टक्केच सर्जिकल साहित्य पुरविण्यात आले, तर मॅनीटॉल, आयसोलेट-पी सारख्या सलाईनचा पुरवठाच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
गत दोन वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागासाठी आवश्यक औषध, सर्जिकल साहित्य अन् प्रयोगशाळा उपकरणांची खरेदी हाफकीनमार्फत करण्यात येत आहे. हाफकीनमार्फत खरेदी प्रक्रियेमुळे वार्षिक खर्च हजार कोटीच्यावर गेला आहे. यापूर्वी तो ६०० कोटीपर्यंत होता. या कालावधीत उलाढाल वाढली, तरी हाफकीनकडून मागणीनुसार पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. गत वर्षभरात हाफकीनकडून केवळ ३० टक्के औषधं, तर १० टक्केच सर्जिकल साहित्याचा पुरवठा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर दिसून येत आहे. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांकडून औषधं बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जातो, तर सर्जिकल साहित्याअभावी शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना खासगीत रेफर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे.

पाच कंपन्या काळ््या यादीत
राज्यभरातून आलेल्या मागणीनुसार, औषधांसह इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी हाफकीनमार्फत संबंधित कंपन्यांना आॅर्डर दिली जाते; मात्र काही कंपन्यांकडून हाफकीनला वेळेत पुरवठा करत नसल्याचे समोर आले आहे. अशा पाच कंपन्यांवर हाफकीनकडून तीन वर्षांसाठी काळ््या यादीत टाकले आहे, तसेच औषधांचा उशिरा पुरवठा करणाऱ्या पाच कंपन्यांवर खरेदीच्या ०.५ टक्के दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रुग्णांना आर्थिक फटका
औषधं उपलब्ध नसल्यास सार्वजनिक आरोग्य संस्थांना तीन लाखांपर्यंत स्थानिक स्तरावर औषध व सर्जिकल साहित्य खरेदी करण्याचे अधिकार आहेत; मात्र तसे न करता रुग्णांनाच औषध खरेदी करण्याचा सल्ला शासकीय रुग्णालयात दिला जात आहे. शिवाय रुग्णांकडून औषधांची देयकंही स्वीकारण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच ८० ते ९० पद भरण्यात आल्याने कामाला गती येत आहे. मागणीनुसार राज्यभरातील बहुतांश भागात औषध व सर्जिकल साहित्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. वेळेत पुरवठा न करणाºया कंपन्यांवर दंडात्मक तसेच काळ््या यादीत टाकण्याची कारवाईदेखील केली आहे.
- परमेश्वर कोगनुरे, व्यवस्थापक, क्वालिटी कंट्रोल आॅफिसर औषध खरेदी विभाग, हाफकीन.

 

Web Title: Halfkin supplies only ten percent of surgical supplies a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.