अकाेला महापालिकेचा २ काेटींचा भूखंड बळकावला; प्रशासन झाेपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 09:45 AM2021-05-13T09:45:17+5:302021-05-13T09:45:25+5:30

Akola Municipal Corporation : बनावट कागदपत्र तयार करून, सुमारे दाेन काेटी रुपयांची ही जागा बळकावण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे.

Grabbed 2 crore plots of Akola Municipal Corporation | अकाेला महापालिकेचा २ काेटींचा भूखंड बळकावला; प्रशासन झाेपेत

अकाेला महापालिकेचा २ काेटींचा भूखंड बळकावला; प्रशासन झाेपेत

Next

अकाेला : महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर या जागेचे बनावट कागदपत्र तयार करून, सुमारे दाेन काेटी रुपयांची ही जागा बळकावण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. काॅंग्रेसमधील एका नगरसेविकेच्या नातेवाइकांनी हा प्रताप केल्याची बाब उजेडात आल्यानंतरही प्रशासन कुंभकर्णी झाेपेत आहे. काेराेनाच्या संकटात जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांना नाेटिसा देऊन त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न हाेत असताना, या गंभीर प्रकरणाची मनपा आयुक्त निमा अराेरा दखल घेऊन कारवाई करतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

स्थानिक अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीसमाेर महापालिकेच्या मालकीचा ४ हजार चाैरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेला भूखंड अग्रवाल नामक इसमाने लीजवर घेतल्याचे कागदाेपत्री दाखविले हाेते. त्यानंतर या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून उत्तर झाेनमधील एका काॅंग्रेस नगरसेविकेच्या पतीला विक्री करण्यात आली. बनावट खरेदी-विक्रीच्या आधारे भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नाेंद नगरसेविका पतीच्या नावाने करण्यात आली. जागेचा मालकी हक्क दाखविताना नियमबाह्यरीत्या फेरफार नाेंदी करण्यात आल्या. या गंभीर प्रकरणाची उत्तर झाेनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी, तसेच नगररचना विभागाला इत्थंभूत माहिती असताना, या जागेकडे प्रशासनाकडून हाेणारा कानाडाेळा संशयास्पद ठरत आहे. प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्यासाठी काेणता ठाेस निर्णय घेतला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

 

प्रभारी अधिकाऱ्यांची चैन

शहरात स्वमालकीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम हाेत असल्याची असंख्य प्रकरणे असून, या प्रत्येक ठिकाणी नगररचना विभागातील प्रभारी अधिकारी व त्यांच्या मर्जीतील सदस्य पाेहाेचून खुलेआम खिसे गरम करीत आहेत. मनपाच्या मालकीचा भूखंड बळकावला जात असताना, या विभागाने साेईस्कर मौन साधले आहे.

 

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत साेईसुविधा देण्यासाेबतच प्रशासनाची गाडी रुळावर आणण्याची मनपा आयुक्त निमा अराेरा यांची भूमिका आहे. प्रशासनाच्या मालकीची जागा घशात घातल्याची बाब उजेडात आल्यानंतर, आता निमा अराेरा काेणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Grabbed 2 crore plots of Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.