सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 02:17 PM2020-02-21T14:17:35+5:302020-02-21T14:17:49+5:30

२२ वर्षीय प्रणवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Gold medal-winning boxer suicides by suicide | सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत गळफास घेऊन आत्महत्या

Next

अकोला : राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेलेला बॉक्सर प्रणव राऊत याने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमजवळच्या क्रीडा प्रबोधनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. २२ वर्षीय प्रणवने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने सुवर्णपदक पटकावले होते.
प्रणव शुक्रवारी सकाळी क्रीडा प्रबोधनीत आला होता. बराच वेळ तो खोलीतून बाहेर न आल्यामुळे मित्रांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद असल्यामुळे अखेर प्रणवच्या मित्रांनी दार तोडलं. त्यावेळी प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रणवने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्रणवच्या आत्महत्येविषयी माहिती मिळताच क्रीडा प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रणवने ऐन उमेदीच्या वयात अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याचा सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अकोल्यासह राज्यभरातील क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणवच्या आत्महत्येचं नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Gold medal-winning boxer suicides by suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.