दिवसभरात चौघांचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह; ४७ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 06:32 PM2020-10-13T18:32:13+5:302020-10-13T18:32:23+5:30

CoronaVirus in Akola चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६० वर गेला आहे.

Four deaths during the day; 33 new positives; 47 corona free | दिवसभरात चौघांचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह; ४७ कोरोनामुक्त

दिवसभरात चौघांचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह; ४७ कोरोनामुक्त

Next

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. मंगळवार, १३ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यातील आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६० वर गेला आहे. दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८६६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदासपेठ येथील तीन जणांसहत मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

तीन पुरुष, एका महिलेचा मृत्यू
मंगळवारी कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये खडकी खदान येथील ६४ वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील ३० वर्षीय महिला, बार्शीटाकळी येथील ५६ वर्षीय पुरुष व कापशी ता. पातूर येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

४७ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३१, कोविड केअर सेंटर अकोला येथून चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून चार, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक अशा एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


३७९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,२२७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four deaths during the day; 33 new positives; 47 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.