थंडीत चढ-उतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:55 AM2020-01-13T10:55:27+5:302020-01-13T10:55:35+5:30

११ जानेवारी रोजी ९.९ अंशावर खाली आले होते; परंतु १२ जानेवारी रोजी यात वाढ होऊन हे किमान तापमान १२ अंशावर पोहोचले आहे.

Fluctuations in cold |  थंडीत चढ-उतार

 थंडीत चढ-उतार

Next

अकोला : पाऊस व ढगाळ वातावरण निवळल्यानंतर जिल्ह्यात दोन दिवस किमान तापमानात घट होऊन चांगलीच हुडहुडी भरली होती; परंतु १२ जानेवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली असून, दिवसा उन्हाचे चटके बसत होते. थंडीत सारखा चढ-उतार सुरू आहे.
गत आठवड्यात पाऊस व ढगाळ वातावरण होते. हे वातावरण निवळल्यानंतर १० व ११ जानेवारी रोजी चांगलीच थंडी पडली. दिवसाही वातावरणात प्रचंड गारवा होता; परंतु १२ जानेवारी रोजी पुन्हा किमान तापमान वाढले. वºहाडात येत्या १८ जानेवारीपर्यंत किमान तापमान १२ ते १५ अंशापर्यंत राहणार असल्याची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. अकोल्याचे किमान तापमान ९ जानेवारी रोजी १५.२ अंश होते. १० जानेवारी रोजी १०.७ तर ११ जानेवारी रोजी ९.९ अंशावर खाली आले होते; परंतु १२ जानेवारी रोजी यात वाढ होऊन हे किमान तापमान १२ अंशावर पोहोचले आहे.कमाल तापमानात वाढ झाली असून, २६.६ वरू न हे तामपान ३०.८ अंशावर पोहोचले.
रविवार, १२ जानेवारी रोजी ५.३० वाजतापर्यंत अकोल्याचे किमान तापमान १२.० होते, तर अमरावती ११.०, बुलडाणा १३.०, चंद्रपूर १०.०, गोंदिया ७.०, नागपूर ८.०, वर्धा १०.०, तर यवतमाळचे किमान तापमान १२.० होते. हेच किमान तापमान दोन दिवसांपूर्वी कमी झाले होते.

Web Title: Fluctuations in cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.