आतषबाजी : सोलापूर, नागपूर, मुंबईत गुन्हे दाखल; अकोला पोलीस परिपत्रकावर अडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:17 PM2018-11-10T13:17:42+5:302018-11-10T13:18:33+5:30

 अकोला: दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन तासांचा कालावधी फटाके उडविण्यासाठी दिला होता, तर या वेळेनंतर किंवा आधी फटाके उडविणाºयांवर फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता; मात्र अकोला पोलिसांनी परिपत्रक न आल्याच्या कारणावरून एकही गुन्हा दाखल केला नाही.

Fireworks: offence filed in Solapur, Nagpur, Mumbai; Akola police admant on circular | आतषबाजी : सोलापूर, नागपूर, मुंबईत गुन्हे दाखल; अकोला पोलीस परिपत्रकावर अडून

आतषबाजी : सोलापूर, नागपूर, मुंबईत गुन्हे दाखल; अकोला पोलीस परिपत्रकावर अडून

Next

- सचिन राऊत

 अकोला: दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रचंड प्रदूषण होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन तासांचा कालावधी फटाके उडविण्यासाठी दिला होता, तर या वेळेनंतर किंवा आधी फटाके उडविणाºयांवर फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता; मात्र अकोलापोलिसांनी परिपत्रक न आल्याच्या कारणावरून एकही गुन्हा दाखल केला नाही, तर मुंबई, नागपूर व सोलापूर शहरात तब्बल २०० च्यावर नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरून वेळेनंतर फटाके फोडणाºयांना अकोला पोलिसांनी अभय दिल्याची चर्चा आहे.
दिवाळीच्या रात्री ८ ते १० वाजेदरम्यान फटाके उडविण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तर यावेळेच्या आधी किंवा नंतर फटाके उडविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; मात्र पोलीस महासंचालक कार्यालयाने परिपत्रक न काढल्याने कारवाईची दिशा स्पष्ट नसल्याच्या कारणावरून अकोला पोलिसांनी नियमित वेळेनंतर फटाके उडविणाºयांवर कोणतीही कारवाई केली नाही. या उलट सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणाºयांवर कारवाईचे निर्देश देताच तेथील ठोणदारांनी तब्बल १३६ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले आहेत, तर मुंबई व नागपूरमध्येही अशाच प्रकारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; मात्र अकोल्यात दिवाळीच्या पहाटे व रात्री १० वाजेनंतर कानठळ्या बसविणाºया मोठ्या फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुरू असताना पोलीस यंत्रणा मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याचे वास्तव आहे.
 
या कलमान्वये केली कारवाई
सोलापूर, नागपूर व मुंबई पोलिसांसह राज्यातील बहुतांश शहरातील पोलिसांनी फटाके उडविणाºयांवर भारतीय दंड विधानाच्या कलम १८८, १९०, १९१ नुसार गुन्हे दाखल केले, तर अकोला पोलिसांनी मात्र एकही गुन्हा दाखल न करता वरिष्ठ स्तरावरून परिपत्रक न आल्याचे कारण समोर करून कारवाईस टाळाटाळ केली.
 
कारवाईची अशीही तत्परता
सोलापूर शहरात दिवाळीच्या पहाटे मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात येत असल्याचे सोलापूर पोलीस आयुक्तांना कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांना प्रमूखांना बोलावून फटाके उडविणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देष दिले. यावरून सोलापूर पोलिसांनी तब्बल १३६ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले; मात्र अकोला पोलीस माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवित असून, प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कारवाईकडे सपशेल कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव आहे.

 

Web Title: Fireworks: offence filed in Solapur, Nagpur, Mumbai; Akola police admant on circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.