फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 05:57 PM2021-05-11T17:57:03+5:302021-05-11T17:57:11+5:30

Crime News : अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध लावून तिला घरी परत आणले.

Finds the girl who was kidnapped | फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध

फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध

Next

अकोला : दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका युवतीस फूस लावून पळवून नेले होते. मार्च २०२० मध्ये या युवतीला पळवून नेल्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध लावून तिला घरी परत आणले, तर तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीला याच गावातील रहिवासी युवकाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणाची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दहीहंडा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत या युवतीचा शोध सुरू केला होता. मात्र, पोलिसांना शोध लागत नव्हता. अल्पवयीन मुली, युवती व महिलांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष हा स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला असून, या कक्षाकडून बेपत्ता असलेल्या युवतीचा शोध सुरू करण्यात आला. एक वर्षापासून बेपत्ता असलेली ही युवती पुण्यातील चाकण परिसरात असल्याची माहिती या कक्षाला मिळाली. यावरून पोलिसांनी पुणे गाठून या युवतीला विश्वासात घेऊन दहीहंडा येथे परत आणले. त्यानंतर तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. या युवतीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आतापर्यंत दहा मुलींना अशाप्रकारे परत आणले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रमुख संजीव राऊत, प्रीती ताठे, महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सूरज मंगरूळकर, संजीव कोल्हटकर व पूनम बचे यांनी केली.

Web Title: Finds the girl who was kidnapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.