शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:42 PM2020-03-18T23:42:42+5:302020-03-18T23:45:01+5:30

शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.

Farmers' suicides continue! | शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे द्रुष्टचक्र सुरूच!

Next

अकोला: दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे चक्र सुरूच आहे. या द्रुष्टचक्रातून शेतकºयांना मुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध उपाययोजना केल्या, कर्जमाफीच्याही योजना दिल्या; मात्र शेतकºयांच्या गळ्याभोवती लागलेला आत्महत्येचा फास सुटता सुटत नाही.
राज्यात सत्तारूढ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली. मागील सरकारने कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी, शर्ती वगळून ही कर्जमाफी योजना असली तरीही शेतकºयांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकला नाही व आत्महत्येचे सत्र थांबले नाही. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. २०२० या नवीन वर्षात विदर्भातील सहा जिल्ह्यांत शंभरावर शेतकºयांनी आपले जीवन संपविले. दिवसांचाच हिशेब केला तर दर दिवसाला एक आत्महत्या, हे दुर्दैवी चित्र आहे.
आर्थिक विवंचना, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या प्रमुख कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
२००५ पासून शासन मदतीत वाढ नाही!
कर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५ च्या शासन आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांच्या संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली, ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

अकोल्यातील आत्महत्येचे वास्तव

2015-195
2016-155
2017-167
2018-142
2019-126
9 मार्च 2020-32
एकूण-1312


तब्बल १०२६ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र
जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३८८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त १ हजार ३१२ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. १ हजार २६ प्रकरणे अपात्र तर ५० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

२०१७ मध्ये साहेबराव करपे यांचे गाव चिल-गव्हाण (यवतमाळ) येथून उपवासाची सुरुवात झाली. दुसºया वर्र्षी ज्या दत्तपूरला त्यांनी आत्महत्या केली, तेथे उपोषण केले. गतवर्षी दिल्लीत म. गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन राजघाट येथे केले. यावर्षी पुण्यात म. फुले यांच्या वाड्याला भेट देऊन राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहोत.
- अमर हबीब

 

Web Title: Farmers' suicides continue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.