म्हैसपूर फाट्यावर शेतकऱ्यांचा आमदार सावरकरांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:00 PM2019-11-03T23:00:00+5:302019-11-03T23:00:02+5:30

शेतकºयांची समजूत काढण्यासाठी फाट्यावर थांबलेल्या आमदार सावरकर यांना घेराव घालत शेतकºयांनी रोष व्यक्त केला.

Farmers gherao to MLA Savarkar at Mhaispur Fata | म्हैसपूर फाट्यावर शेतकऱ्यांचा आमदार सावरकरांना घेराव

म्हैसपूर फाट्यावर शेतकऱ्यांचा आमदार सावरकरांना घेराव

googlenewsNext

अकोला : पीक नुकसानाच्या नियोजीत पाहणी दौºयात रविवारी मुख्यमंत्री म्हैसपूर फाट्यावर न थांबता पुढे निघून गेले. मुख्यमंत्र्यांच्या पीक नुकसान पाहणीत म्हैसपूर फाटा शिवाराला बगल देण्यात आल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेली पिके रस्त्यावर फेकून निषेध केला. तसेच परतीच्या प्रवासात शेतकºयांची समजूत काढण्यासाठी फाट्यावर थांबलेल्या आमदार सावरकर यांना घेराव घालत शेतकºयांनी रोष व्यक्त केला.
पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ नोव्हेंबर रोजी अकोला दौºयावर आले होते. नियोजीत पीक पाहणी दौºयात सकाळी ११.२० वाजता म्हैसपूर फाटा शिवारातील पीक नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री करणार होते. त्यानुसार म्हैसपूर येथील शेतकरी सकाळपासूनच फाट्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करीत होते; मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा म्हैसपूर फाट्यावर न थांबता, पुढे लाखनवाडा, कापशी व चिखलगावकडे रवाना झाला. नियोजीत दौºयानुसार मुख्यमंत्री म्हैसपूर फाटा येथे थांबले नाही आणि पीक नुकसानाची पाहणी केली नसल्याने, शेतकºयांची निराशा झाली. चिखलगाव येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा परत येत असताना म्हैसपूर फाट्यावर शेतकरी थांबलेलेच होते. संतप्त झालेल्या शेतकºयांची समजूत काढण्यासाठी आमदार सावरकर म्हैसपूर फाट्यावर उतरले व त्यांनी शेतकºयांसोबत संवाद साधला. नियोजित दौºयानुसार मुख्यमंत्री म्हैसपूर फाट्यावर थांबले नाहीत हा म्हैसपूरच्या शेतकºयांचा अपमान आहे, अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी रणधीर सावरकर यांनी शेतकºयांची समजूत काढत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीरीही व्यक्त केली. म्हैसपूरला डावलण्याचा हेतू असता, तर नियोजित कार्यक्रमात गावाच नावच कशाला टाकले असते, असा सवाल करत आमदार सावरकरांनी गावकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

 

Web Title: Farmers gherao to MLA Savarkar at Mhaispur Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.