बील न भरणाऱ्या १,६७६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 05:05 PM2021-06-22T17:05:59+5:302021-06-22T17:06:11+5:30

Electricity supply disconnetd to 1676 customers : १४४३ घरगुती, १८९ वाणिज्यिक आणि ४४ औद्योगिक अशा एकूण १६७६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

Electricity supply disconnetd to 1676 customers who did not pay their bills | बील न भरणाऱ्या १,६७६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

बील न भरणाऱ्या १,६७६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

Next

अकोला: महावितरणच्याअकोला परिमंडळात वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला आता वेग आला असून गेल्या दोन दिवसात वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या १४४३ घरगुती, १८९ वाणिज्यिक आणि ४४ औद्योगिक अशा एकूण १६७६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

या ग्राहकांकडे अणुक्रमे १ कोटी १० लाख,१९.२६ लाख आणि १०.५५ लाख रूपयांची थकबाकी आहे. कारवाईमुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज ग्राहका़ना थकबाकीसह पुनर्जोडणी चार्जेसचा शिलकीचा दंड भरावा लागणार आहे.

 

कोरोना काळात वसूलीपेक्षा महावितरणने सेवेला प्राधान्य देते अखंडित वीज पुरवठा केला.परंतू या काळात अपवादात्मक ग्राहक वगळता वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पुर्णता दुर्लक्ष केल्याने महावितरणसमोर आर्थीक संकट निर्माण झाले आहे.महावितरणसमोर आता वसूलीशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ३० जुन पर्यंत ४३२ कोटीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी महावितरणने कारवाईच्या मोहिमेला अधिक गती दिली आहे.

 

अकोला परिमंडलाअंतर्गत विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून ४३२ कोटी थकित देयके वसूल करण्याचे उद्दीष्ट असताना परिमंडलात १ लाख ४१ हजार ३२० असे घरगूती ग्राहक आहेत त्यांच्याकडे प्रत्येकी ५ हजार आणि त्यापेक्षा जास्त रूपयाची थकबाकी आहे. हिच संख्या वाणिज्यिक ग्राहकांची १८२३६ आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या ५०२८ आहे. त्यांच्याकडे अणुक्रमे १६२ कोटी,२९ कोटी आणि २४ कोटी रूपयांची वीज देयकांची थकबाकी आहे.

 

जिल्ह्यानिहाय थकबाकीदार घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांमध्ये सर्वात जास्त म्हणजे ६८ हजार घरगुती ग्राहक हे बुलडाणा जिल्ह्याचे असून त्यांच्याकडे प्रत्येकी ५ हजार आणि त्यापेक्षा जास्त रूपये असे एकून ७४ कोटी ७१ लाख वीज देयकाचे थकित आहे. तर वाणिज्यिक ग्राहकांची संख्या ही ७८२१ असून त्यांच्याकडे १२ कोटी थकले आहे.औद्योगिक थकबाकीदारांची संख्या ही २३०० असून थकबाकी ही ९ कोटी ४० लाख आहे. अकोला जिल्ह्यात ५२५०० घरगुती ग्राहकांकडे ६२ कोटीची वीज देयके थकली आहेत. ७२२० वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटीची वीज देयके थकली आहेत तर १७५२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ८२ लाख वीज देयकाचे थकले आहे. हिच संख्या वाशिम जिल्ह्यातील २० हजार ७३० घरगुती ग्राहकांकडे २५.२० कोटी,३२०० वाणिज्यिक ग्राहकांकडे ५.३२ कोटी आणि औद्योगिक वर्गवारितील ९८० ग्राहकांकडे ६.७४ लाख वीज देयकाचे थकित आहे.

 

वीज ग्राहक वीज बिल भरण्याला प्रतिसाद देत नसेल तर महावितरणला नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्राहकांना रिकनेक्शन चार्जेस वेगळे भरावे लागणार असल्याने महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत देयकांचा भरणा करून सहकार्य करावे.

 

- अनिल डोये, मुख्य अभियंता,

महावितरण अकोला परिमंडळ

Web Title: Electricity supply disconnetd to 1676 customers who did not pay their bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.